‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवणारी पूजा सावंत लवकरच सिद्धेश चव्हाणशी लग्नगाठ बांधणार आहे. नुकताच दोघांचा साखरपुडा थाटामाटात पार पडला. १६ फेब्रुवारीला मोजक्या पाहुण्यांच्या आणि मित्र-मैत्रींणीच्या उपस्थितीत पूजा व सिद्धेशचा साखरपुडा झाला. याचे फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत. अशातच पूजाच्या साखरपुड्यातील एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री पूजा सावंतने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला आहे. ‘यू आर द बेस्ट’ असं या व्हिडीओवर अभिनेत्रीने लिहिलं आहे. या व्हिडीओत मित्र हेमंत दळवी अनोख्या अंदाजात पूजा व सिद्धेशचं साखरपुड्याच्या कार्यक्रमात स्वागत करताना पाहायला मिळत आहे.

हेह वाचा – दीड वर्षांनंतर सई लोकूर लेकीसह भेटली मेघा धाडे व शर्मिष्ठा राऊतला, म्हणाली…

हेमंत पूजा व सिद्धेशचं स्वागत करताना म्हणतो की, गेले काही दिवस गोकुळधाममधल्या आमच्या वृंदावनात क्षणभरही विश्रांती नाहीये. कारण एवढी वर्ष प्रेमापासून लपाछपी खेळणाऱ्या पूजाचं मनं जिंकणारा विजेता आम्हाला सापडला आहे. तर आता फेब्रुवारी महिना आहे, प्रेमाचा सीझन आहे. सगळीकडे गुलाबी रंग दाटलेला आहे. या गुलाबी रंगात बोनस म्हणून आज एंगेजमेंटचा कार्यक्रम आपण करतोय. या कार्यक्रमाची धुरा सांभाळण्यासाठी तुमचा पोस्टर बॉइज हेमंत तुमच्यासमोर उभा आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे.” यामध्ये पूजाच्या काही चित्रपटाच्या नावांचा वापर उत्तमरित्या हेमंतने केला आहे. त्यामुळे व्हिडीओच्या प्रतिक्रियेत पूजाच्या या खास मित्राचं कौतुक केलं जात आहे.

हेही वाचा – “…म्हणून त्याची पाठ थोपटावी वाटली”, किरण मानेंनी केलं भरत जाधवांचं कौतुक, कारण…

दरम्यान, पूजाचं लग्न कधी, कुठे असणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण मेहंदी, हळद, संगीत, सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्नसोहळा पूजाचा असणार आहे. संगीताची तयारी सुरू झाली आहे, अशी माहिती वैभव तत्ववादीने दिली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pooja sawant and siddhesh chavan unique ways welcome in engagement ceremony pps