मराठी कलाविश्वातील कलरफुल अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांचा साखरपुडा १६ फेब्रुवारीला थाटामाटात पार पडला. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात जोडीदाराबरोबर रोमँटिक फोटो शेअर करत पूजाने लवकरच लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं. तेव्हापासून तिच्या चाहत्यांच्या मनात अभिनेत्रीच्या लग्नाबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर शुक्रवारी ( १६ फेब्रुवारी २०२४) गुपचूप साखरपुडा उरकत अभिनेत्रीने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

पूजा व सिद्धेश शुक्रवारी सायंकाळी मीडियासमोर आले आणि दोघांनी आपल्या हातातल्या अंगठ्या कॅमेऱ्यासमोर दाखवत साखरपुडा पार पडल्याचं सांगितलं. पूजाने या सोहळ्यात पारंपरिक आणि वेस्टर्न असे दोन लूक केले होते. पहिल्यांदा अभिनेत्रीने हिरवी पैठणी साडी, नाकात नथ असा पारंपरिक लूक केला होता. तर, सिद्धेशने यावेळी ऑफ व्हाइट रंगाचा सदरा परिधान केला होता.

Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Madhuri dixit shared glowing skincare hack for dull dry skin in winters know expert advice
बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने सांगितलं त्वचेचं रहस्य! ‘या’ रेसिपीने चेहरा दिसेल चमकदार, कोरड्या त्वचेची समस्या दूर
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार
gold jewelry scam with housewife in kurla
बनावट दागिन्यांच्या बदल्यात खरे दागिने घेऊन महिला पसार

हेही वाचा : “रोज सकाळी कचरा जाळतात अन्…”, परिसरातील ‘तो’ प्रकार पाहून मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट; म्हणाली, “हा कामचुकारपणा…”

साखरपुड्यात अंगठी घालताना दोघांनीही वेस्टर्न लूक केल्याचं पाहायला मिळालं. पूजाने समारंभाच्या पांढऱ्या रंगाच्या थीमनुसार संपूर्ण पांढरा लेहेंगा आणि सिद्धेशने होणाऱ्या बायकोला मॅचिंग अशी पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती.

हेही वाचा : “या फोटोत माझं तोंड बंद आहे म्हणून…”, प्रसाद ओकच्या वाढदिवशी बायकोने शेअर केला ‘तो’ मजेशीर फोटो, म्हणाली…

अभिनेत्रीच्या बहिणीने या सोहळ्याची लहानशी झलक इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली आहे. यामध्ये भव्य सजावट, पांढऱ्या शुभ्र फुलांमध्ये सोनेरी गुलाबांची आकर्षक मांडणी, पूजा व सिद्धेश यांच्या नावाचा लोगो ( SP ) या सगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. अभिनेत्रीच्या साखरपुड्याला तिच्या सगळ्या जवळच्या मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती.

pooja
पूजा सावंत साखरपुडा

प्रार्थना बेहेरे व तिचा पती अभिषेक जावकर, गश्मीर व गौरी महाजनी, भूषण प्रधान, वैभव तत्त्ववादी, नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर या सगळ्यांनी पूजाच्या साखरपुड्याला खास उपस्थितीत लावली होती. आता लवकरच अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे.

Story img Loader