Prarthana Behere : सध्या संपूर्ण देशभरात दिवाळीच्या सणानिमित्त आनंदाचं वातावरण आहे. सणवारानिमित्त आपल्याला जवळच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना भेटण्याची संधी मिळते. तर, अनेक लोक अशा सणासुदींच्या दिवसांमध्ये खास रियुनियन पार्ट्यांचं आयोजन करतात. मराठी कलाविश्वातील अशाच काही जवळच्या मित्रमंडळींचं आज प्रार्थना बेहेरेच्या घरी रियुनियन होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार एकमेकांचे खूप चांगले आणि घट्ट मित्र आहेत. पूजा सावंत, प्रार्थना बेहेरे व तिचा पती अभिषेक जावकर, भूषण प्रधान, वैभव तत्त्ववादी, अनुषा दांडेकर यांची गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांशी खूप जवळची मैत्री आहे. पूजाच्या लग्नात हे सगळे मित्र एकत्र भेटले होते. त्यानंतर आता अनेक महिन्यांनी हे सगळे जण प्रार्थना बेहेरेच्या अलिबागच्या नव्या घरात एकत्र जमले आहेत.

हेही वाचा : Video : अविनाश नारकरांनी दिवाळीसाठी केल्या सुबक करंज्या! पतीला फराळ करताना पाहून ऐश्वर्या म्हणाल्या, “कमाल…”

प्रार्थनाच्या अलिबागच्या घरी पोहोचले जवळचे मित्र-मैत्रिणी

प्रार्थना बेहेरेने ( Prarthana Behere ) साधरणत: वर्षभरापूर्वी मुंबई सोडून अलिबागला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्रीचा पती अभिषेक जावकरचं अलिबागमध्ये सुंदर असं फार्महाऊस आहे. याठिकाणी हे सगळे कुटुंबीय आनंदाने राहतात. प्रार्थना शूटिंगसाठी अलिबागहून प्रवास करते. निसर्गाच्या सानिध्यात राहायला मिळतंय ही खूपच चांगली गोष्ट असल्याचं प्रार्थनाने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. आता तिचं सुंदर घर पाहण्यासाठी तिचे मित्रमंडळी देखील अलिबागला पोहोचले आहेत.

पूजाची बहीण रुचिरा सावंतने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत प्रार्थनाच्या घरी पोहोचल्याची माहिती दिली आहे. तर, प्रार्थनाने सुद्धा हा व्हिडीओ रिशेअर केला आहे. पूजा सावंत या व्हिडीओमध्ये “प्रार्थना बेहेरे इथेच राहतात का?” असं विचारते. यानंतर प्रार्थनाने दरवाजा उघडून आपल्या मित्रांची गळाभेट घेतल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : ‘झी मराठी’च्या दोन लोकप्रिय मालिकांची निर्माती आहे शर्मिष्ठा राऊत! पुरस्कारांचा फोटो शेअर करत म्हणाली, “सलग दुसरं वर्ष…”

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/10/pooja.mp4

हेही वाचा : साध्या पद्धतीने लग्नसोहळा पार पडल्यावर पृथ्वीक प्रताप पत्नीसह पोहोचला देवदर्शनाला, ‘त्या’ फोटोने वेधलं लक्ष

Prarthana Behere

यंदाची दिवाळी हे सगळेजण मिळून प्रार्थनाच्या ( Prarthana Behere ) घरी साजरी करणार आहेत. दरम्यान, पूजा सावंतची ही लग्नानंतरची पहिली दिवाळी असणार आहे. यापूर्वीचे अनेक सण पूजाने नवऱ्याबरोबर ऑस्ट्रेलियात साजरे केले होते. गणपतीच्या सणाला पूजा आवर्जून भारतात आली होती. त्यामुळे आता अभिनेत्री हा दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी ऑस्ट्रेलिया गाठणार की तिचा नवरा भारतात परतणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pooja sawant bhushan pradhan and other visited prarthana behere new home in alibaug sva 00