Pooja Sawant : महाराष्ट्राची ‘कलरफूल’ अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांचा लग्नसोहळा २८ फेब्रुवारी २०२४ रोजी पार पडला. आज अभिनेत्रीच्या लग्नाला बरोबर सहा महिने पूर्ण झाले आहेत. गेल्यावर्षी ( २०२३ ) नोव्हेंबर महिन्यात पूजाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. यानंतर अभिनेत्रीच्या लग्नाची सर्वत्र आतुरतेने वाट पाहिली जात होती. अखेर फेब्रुवारी महिन्याच्या अखेरिस लग्नगाठ बांधत पूजाने सर्वांना आनंदाची बातमी दिली.

पूजाच्या ( Pooja Sawant ) लग्नाला आज लग्नाला सहा महिने पूर्ण झाल्याने तिने आपल्या नवऱ्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. याशिवाय अभिनेत्रीच्या नवऱ्याने तिला गोड सरप्राइज देखील दिलं आहे. याचा फोटो पूजाने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
shraddha aarya new born baby photo
प्रसिद्ध अभिनेत्री लग्नानंतर ३ वर्षांनी झाली जुळ्या मुलांची आई, पहिल्यांदाच एका बाळाबरोबरचा फोटो केला शेअर

हेही वाचा : पहिल्या नजरेत प्रेम, हिरोने लपवली ओळख अन्…; २३ वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होणार ‘हा’ रोमँटिक चित्रपट! आजही प्रत्येक गाणं आहे सुपरहिट

लग्नाला सहा महिने पूर्ण होताच पूजाने लग्नातील काही unseen फोटो शेअर केले आहेत. “सहा महिन्यांआधी आम्ही एका नव्या प्रवासाला सुरुवात केली. या प्रवासातील प्रत्येक दिवस सुखाचा होता. तुम्ही सर्वांनी मला आणि सिडला ( Sid ) दिलेलं प्रेम, आशीर्वाद यासाठी आम्ही दोघं कायम ऋणी असू…आमच्यावर असंच प्रेम करत राहा” अशी पोस्ट शेअर करत पूजाने तिच्या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत.

नवऱ्याने दिलं गोड Surprise

पूजाला ( Pooja Sawant ) तिच्या नवऱ्याने देखील खास सरप्राइज दिलं आहे. “Happy Six Moths Boju” अशी चिठ्ठी लिहून त्याच्या बाजूला सिद्धेशने गुलाबाचं फूल ठेवल्याचं या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीचा नवरा तिला प्रेमाने Boju या नावाने हाक मारतो. पूजा सध्या ऑस्ट्रेलियात असल्याने हा खास दिवस ती परदेशात साजरा करणार आहे.

हेही वाचा : Video: धनंजय पोवारच्या पत्नी व आईने ‘बिग बॉस’वर आरोप करत व्यक्त केली नाराजी, म्हणाल्या, “त्याला दाखवतंच नाहीये काय भानगड…”

Pooja Sawant
पूजाला नवऱ्याने दिलं खास Suprise ( Pooja Sawant )

हेही वाचा : ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार ‘हे’ कलाकार! ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेता साकारणार प्रमुख भूमिका, पाहा प्रोमो

पूजाचा ( Pooja Sawant ) नवरा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. त्यामुळे अभिनेत्री सध्या काम व शूटिंगमधून वेळ मिळाला की, परदेशात जाते असं पाहायला मिळतंय. पूजाने शेअर केलेल्या सुंदर फोटोंवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Story img Loader