महाराष्ट्राची ‘कलरफूल’ अभिनेत्री पूजा सावंत सध्या ऑस्ट्रेलियात पतीबरोबर रंगपंचमीचा आनंद घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात २८ फेब्रुवारीला पूजाने सिद्धेश चव्हाणशी लग्न केलं. थाटामाटात लग्नसोहळा पार पडल्यावर हे जोडपं ऑस्ट्रेलियाला गेलं आहे. हे दोघेही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. अभिनेत्रीने परदेशातील धुळवडीची खास झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूजाचा नवरा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. त्यामुळे अभिनेत्री देखील लग्नानंतर काही दिवसांसाठी बाहेरगावी गेली आहे. सध्या जगभरात होळी व रंगपंचमी सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियात सगळे भारतीय एकत्र येऊन होळी साजरी करतात. पूजा-सिद्धेश देखील यामध्ये सहभागी झाले आहेत.

हेही वाचा : Video : कुशल बद्रिकेच्या पत्नीने पेटत्या होळीतून काढला नारळ; अभिनेता म्हणाला, “बालपणाच्या खोड्या…”

पूजा सावंत सासरच्या मंडळींसह ऑस्ट्रेलियातील होळी सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली आहे. याचे काही खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये मराठमोळं ढोलपथक, रंगांची उधळण याची खास झलक पाहायला मिळत आहे. याशिवाय पूजाच्या दीराने देखील त्यांचा एकत्र मजा करतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा : ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यावर शरद पोंक्षे म्हणाले, “८३ वर्षांचं आयुष्य ३ तासांत दाखवणं अवघड, पण…”

पूजा सावंतने शेअर केले होळीचे खास फोटो

दरम्यान, पूजा सावंत व सिद्धेश चव्हाण यांचं लग्न अरेंज मॅरेज पद्धतीत जमलं आहे. या दोघांच्या लग्नाला सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ती शेवटची ‘मुसाफिरा’ चित्रपटामध्ये झळकली होती.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pooja sawant celebrates holi in australia with husband photos viral sva 00