Pooja Sawant First Makar Sankrant : ‘महाराष्ट्राची कलरफूल’ अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखलं जातं. घराघरांत तिचा एक वेगळा चाहतावर्ग तयार झाला आहे. सिनेविश्वात यश मिळाल्यावर वैयक्तिक आयुष्यात पूजाने लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्रीने फेब्रुवारी २०२४ मध्ये सिद्धेश चव्हाणशी लग्नगाठ बांधली. पूजाचा पती सिद्धेश चव्हाण कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. त्यामुळे अभिनेत्री लग्नानंतर अनेकदा दोन देशांमध्ये प्रवास करताना दिसते.

यंदा २०२५ या नवीन वर्षाचं स्वागत पूजा सावंतने आपल्या कुटुंबीयांसह ऑस्ट्रेलियात केलं. पूजा सावंतचे आई-बाबा, तिची दोन्ही भावंडं सध्या ऑस्ट्रेलियात आहेत. या कुटुंबीयांनी मिळून काही दिवसांपूर्वीच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही कसोटी मॅच पाहण्यासाठी सुद्धा उपस्थिती लावली होती. यानंतर आता नुकतीच ऑस्ट्रेलियात पूजा सावंतची पहिली मकर संक्रांत साजरी करण्यात आली आहे.

हेही वाचा : “Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ

पूजाने पहिल्या संक्रातीनिमित्त काळ्या रंगाची पैठणी साडी, त्यावर हलव्याचे दागिने असा पारंपरिक लूक केला होता. पतीबरोबर तिने खास फोटोशूट केल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय अभिनेत्रीने ऑस्ट्रेलियात आपल्या बहिणीसह साडी नेसून ‘मलाल’ चित्रपटातील ‘उधळ हो’ गाण्यावर जबरदस्त डान्स केल्याचं पाहायला मिळत आहे.

रुचिरा सावंतने डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिने या व्हिडीओला “माझ्या सुंदर बहिणीची पहिली मकर संक्रांत” असं कॅप्शन दिलं आहे. यामध्ये पूजाने ‘उधळ हो’ गाण्यावर ठेका धरल्याचं दिसत आहे.

हेही वाचा : “२७ वर्षांपूर्वी त्यांना पहिल्यांदा पाहिलं…”, क्रांती रेडकर अन् समीर वानखेडेंच्या लग्नाला ८ वर्षे पूर्ण, दोघांची पहिली भेट कुठे झाली?

हेही वाचा : शिवाली परबने शाहरुख खानपासून ते जॅकी जॅनपर्यंतच्या कलाकारांना पाठवला ‘मंगला’ चित्रपटाचा ट्रेलर; सयाजी शिंदेंचं आलं प्रत्युत्तर, म्हणाले…

पूजाचा हा मराठमोळा अंदाज नेटकऱ्यांना सुद्धा भावला आहे. “ही आपली खरी मराठी हिरोईन”, “खूप सुंदर डान्स”, “कलरफूल”, “खूप सुंदर पूजा ताई” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.

दरम्यान, पूजाच्या ( Pooja Sawant ) कामाबद्दल सांगायचं झालं, पूजाचा नवरा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. त्यामुळे अभिनेत्री सध्या काम व शूटिंगमधून वेळ मिळाला की, परदेशात जाते असं पाहायला मिळतंय. ती शेवटची पुष्कर जोगच्या ‘मुसाफिरा’ चित्रपटात झळकली होती. याशिवाय तिचं नुकतंच प्रदर्शित झालेलं ‘नाच गो बया’ हे गाणं देखील सोशल मीडियावर लोकप्रिय ठरलं आहे.

Story img Loader