मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांचा लग्नसोहळा २८ फेब्रुवारी २०२४ रोजी थाटामाटात पार पडला. पूजाच्या मेहंदी, संगीत, हळद, लग्न व रिसेप्शन सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली होती. याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

लग्नानंतर पूजा सावंतच्या सासरी म्हणजेच सिद्धेशच्या घरी सत्यनारायणाची पूजा पार पडली आणि मग या जोडप्याने सिद्धिविनायकाचं दर्शन घेत आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली. अभिनेत्री सध्या आपल्या पतीबरोबर ऑस्ट्रेलियात एकत्र वेळ घालवत आहे. आज लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याने सिद्धेशने पूजासाठी खास पदार्थ बनवला आहे. त्याचा फोटो पूजाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
shukra guru make navpancham yog
नवपंचम राजयोग देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींवर शुक्र-गुरूची होणार कृपा
Lagnanantar Hoilach Prem New Promo
लग्नानंतर होईलच प्रेम : ‘या’ तामिळ मालिकेचा रिमेक, मृणालचं कमबॅक अन्…; पाहा जबरदस्त नवीन प्रोमो

हेही वाचा… हिरवा चुडा, मेहेंदीने रंगलेले हात… पूजा सावंतने शेअर केले हनिमूनचे फोटो; म्हणाली, “अजूनही…”

लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सिद्धेशने पूजासाठी एक खास पदार्थ तयार केला आहे. पूजाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीवर याचा फोटो शेअर केला आहे, ज्यात सिद्धेशने बनवलेली खास मेजवानी दिसतेय. या फोटोत चमचमीत मटर पुलावाने सजलेलं ताट पाहायला मिळतंय. या सोबत झणझणीत कांदादेखील सर्व्ह केला गेला आहे. “लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याने माझ्या पतीने मला ट्रीट दिली आहे”, असं कॅप्शन या स्टोरीला पूजाने दिलं आहे.

लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याने पूजा आणि सिद्धेशसाठी आजचा दिवस खूप खास आहे. सिद्धेशने दिलेल्या ट्रीटबरोबरच पूजाने सोशल मीडियावर लग्नातील एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. ‘मन धागा धागा’ हे तिचं आयकॉनिक गाणं जोडत दोघांच्या लग्नातील विधी, पाहुणेमंडळी आणि लग्नातील त्यांचे भावनिक क्षण यात टिपले गेले आहेत. या व्हिडीओला कॅप्शन देत अभिनेत्रीने लिहिले, “मला असं वाटतं की, मी काल रात्री पाहिलेल्या एका सर्वात सुंदर स्वप्नातून उठले आहे. लग्नाला एक महिना पूर्ण झालाय यावर माझा विश्वासच बसत नाही आहे.”

हेही वाचा… शाहरुख खानच्या मन्नतला मागे टाकत सर्वात महागडं ठरणार रणबीर कपूरचं नवीन घर? बंगल्याला देणार लाडक्या लेकीचं नाव

दरम्यान, पूजा आणि सिद्धेश यांचं लग्न अरेंज मॅरेज पद्धतीत जमलं आहे. २८ नोव्हेंबर २०२३ रोजी पूजाने तिचा आणि सिद्धेशचा पोठमोरा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांच्या नात्याची कबुली दिली होती, तेव्हापासून पूजाचे चाहते तिच्या लग्नाची आतूरतेने वाट पाहत होते. नंतर १६ फेब्रुवारीला दोघांचा साखरपुडा नातेवाईक आणि मित्रपरिवारासमवेत पार पडला.

Story img Loader