मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री पूजा सावंत काही महिन्यांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पूजाने फेब्रुवारी महिन्यात सिद्धेश चव्हाणबरोबर लग्नगाठ बांधली. लग्नानंतर काही महिने ती पतीसह ऑस्ट्रेलियामध्ये राहायला गेली होती. आता ती भारतात परत आली आहे.
कलरफुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीचे लाखो चाहते आहेत. चाहत्यांबरोबर संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही ती चाहत्यांबरोबर शेअर करीत असते. आता पूजाचा गुलाबी साडीतील एक व्हिडीओ चर्चेत आहे.
“गुलाबी साडी आणि लाली लाल लाल…” हे गाणं आजही सगळ्यांच्या ओठावर आपसूकच येत. अनेक महिन्यांपासून या गाण्यावर अनेक एन्फ्ल्यूएन्सर आणि कलाकार व्हिडीओ बनवत आहेत. आता या गाण्याची भुरळ पूजालादेखील पडली आहे.
पूजानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या गाण्यावरील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पूजानं अर्थात गुलाबी रंगाची सुंदर पैठणी नेसली आहे. चंद्रकोर, केसांत गजरा, नाकात नथ अशा मराठमोळ्या रूपात पूजाचं सौंदर्य अगदी खुलून दिसतंय.
“तुम्ही गुलाबी साडी नेसल्यावर कोणत्याही वेगळ्या गाण्यावर रील बनवणं बेकायदा आहे,” अशी कॅप्शन पूजानं या व्हिडीओला दिली आहे.
पूजानं नेसलेली ही सुंदर साडी कांक्षिणी या ब्रॅॅण्डची असून, तिनं त्यांचे आभार मानत कॅप्शनमध्ये पुढे लिहिलं की,कांक्षिणी स्टुडिओ इतक्या सुंदर गुलाबी पैठणीसाठी खूप सारे थॅंक यू!
हेही वाचा… “तिला नीट उभं राहता…”, प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितली कतरिना कैफच्या करिअरच्या सुरूवातीची आठवण
पूजाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. अभिनेत्रीच्या चाहत्यांनी यावर कमेंट्स करीत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्यानं कमेंट करीत लिहिलं, “खूपच सुंदर दिसते आहेस.” तर दुसऱ्यानं “ब्युटीफूल इन पिंक”, अशी कमेंट केली आहे. अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करीत त्यांच्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.
दरम्यान, पूजा सावंतच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर क्रॅक या बॉलीवूड चित्रपटातील “ले ले रोम रोम” या गाण्यात पूजा शेवटची झळकली होती. तर आगामी चित्रपट ‘काँग्रॅच्युलेशन्स’मध्ये पूजा झळकणार असल्याची चर्चा आहे.