‘महाराष्ट्राची कलरफूल’ अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखलं जातं. गेल्या काही महिन्यांपासून ती तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. पूजाने गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात लग्नबंधनात अडकणार असल्याची गुडन्यूज तिच्या चाहत्यांना दिली होती. यानंतर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पूजाचा साखरपुडा व लग्नसोहळा थाटामाटात पार पडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्रीने २८ फेब्रुवारीला सिद्धेश चव्हाणशी लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर पूजाच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाले होते. पूजाचा नवरा कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला असतो त्यामुळे अनेक मुलाखतींमध्ये तिला लग्नानंतर कुठे राहणार याबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. यावर अभिनेत्रीने येऊन-जाऊन सवडीनुसार सगळं नियोजन करणार असं उत्तर दिलं होतं. यानुसार लग्नानंतर पूजा नवऱ्याबरोबर ऑस्ट्रेलियाला गेली होती.

हेही वाचा : “अपून तो हिरो बनगया!”, सलूनच्या बाहेर स्वत:चा फोटो पाहून संतोष जुवेकर म्हणाला, “शाहरुख, सलमान खान…”

पूजाने ऑस्ट्रेलियात होळी, रंगपंचमी, पहिला गुढीपाडवा असे सगळे सण साजरे केले. तसेच अनेकदा अभिनेत्रीच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवरून तिच्या चाहत्यांना ऑस्ट्रेलियातील अनेक ठिकाणांची झलक पाहायला मिळाली. लग्नानंतर संसाराला वेळ देऊन आता दीड महिन्यांनी पूजा मुंबईत परतली आहे. पूजाची बहीण रुचिराने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

हेही वाचा : Video : गर्जा महाराष्ट्र माझा! नऊवारी साडी नेसून सोनाली कुलकर्णी व फुलवा खामकरचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

रुचिरा तिच्या स्टोरीमध्ये म्हणते, “फायनली ती परत आलीये…मला माझ्या हक्काची ड्रायव्हर पुन्हा भेटली आहे.” रुचिराने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पूजा गाडी चालवत असल्याचं पाहायला मिळत आहे. लाडकी बहीण भारतात आल्याने तिला सुद्धा आनंद झालेला आहे. याशिवाय रुचिराने दिलेल्या या आनंदाच्या बातमीमुळे पूजाचे हजारो चाहते सुद्धा आनंदी झाले आहेत.

रुचिरा सावंत इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, पूजाच्या कामाबद्दल सांगायचं, तर शेवटची ती ‘मुसाफिरा’ या चित्रपटात पुष्कर जोगबरोबर झळकली होती. आता तिला आगामी काळात नवनवीन प्रोजेक्टमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक उत्साही आहेत.