अभिनेत्री पूजा सावंत हिने आपल्या अभिनयाबरोबरचं नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. सध्या ती आगामी चित्रपट ‘मुसाफिरा’मुळे चर्चेत आहे. जुन्या आठवणी पुसून नवे आयुष्य जगण्याची नवी परिभाषा शिकविणारा ‘मुसाफिरा’ २ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याचनिमित्ताने चित्रपटातील कलाकार ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये सहभागी झाले होते. यावेळी पूजाने लग्न कधी करणार? आणि कुठे करणार? याचा खुलासा केला.

‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये अभिनेत्री पूजा सावंतला विचारलं गेलं की, लग्नाचं प्लॅनिंग काय आहे? लग्न कधी करणार? यावर पूजा म्हणाली, “हे तुम्ही सिद्धेशला पण विचारा. कारण मी त्याच्या सुट्यांसाठी थांबली आहे. आम्हाला याच वर्षी लग्न करायचं आहे. त्याचं फेब्रुवारी, मार्चमध्ये भारतात येणं आहे. जर त्याला सुट्टी मिळाली तर मग चट मंगनी पट ब्याह अशा पद्धतीत लग्न होऊ शकतं. कारण वर्षभर पुढे मला वेळ नाहीये.”

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Should a divorced wife receive maintenance under any circumstances
घटस्फोटीत पत्नीला कोणत्याही परिस्थितीत निर्वाहनिधी मिळालाच पाहिजे का?

हेही वाचा – Video: सुशांत सिंह राजपूतच्या जन्मदिवसानिमित्ताने बहिणीची खास पोस्ट, अभिनेत्याच्या आठवणींना उजाळा देत म्हणाली…

पुढे पूजा डेस्टिनेशन वेडिंग संदर्भात म्हणाली, “आता जे काही डेस्टिनेशन वेडिंग फॅड आलंय, ते लोक फक्त इन्स्टाग्रामसाठी करतात असं मला वाटू लागलंय. त्यामुळे मला लग्न आणि विधींचा जो गोडवा आहे, तो मला जपायचा आहे. सिद्धेश पण साधा आहे. त्याला पण साध्या गोष्टी आवडतात. त्यामुळे आम्ही जे काही ठरवू ते आयुष्यातलं असं खूप मोठं वगैरे असं काही नसेल. खूप साधं आणि कुटुंबाच्या उपस्थित असेल. पण यावर्षात लग्नाचा प्लॅन करू.”

यानंतर पूजाला विचारलं की, लग्न कोकणात करणार की मुंबईत? तेव्हा अभिनेत्री म्हणाली, “मुंबईत. मला डेस्टिनेशन वेडिंग नाही करायचं. डेस्टिनेशन वेडिंग सुंदर आहे. कुठेतरी दूर एक लोकेशन असतं आणि सगळी माणसं तिथे पोहोचतात. पण मी शूटमध्येच इतका प्रवास करते. तर मला माझ्या लग्नाच्या दिवशी प्रवास नाही करायचा. सुटकेस घेतली ना? हे राहिलं, ते राहिलं, चला, चला वेळेवरती असं मला नाही करायचं. मला माझ्या घरात सकाळी छान उठायचं आहे. माझ्या आईच्या हातचा नाष्टा करायचा आहे आणि मग तयार होऊन लग्नाला जायचं आहे. जिथे कुठे लग्नाचं ठिकाण असेल तिकडे माझ्या सर्व माणसांनी छान पोहोचावं. त्यांचा जो काही प्रवास असेल तो सुखकर असावा. उगाच कुठे लग्न करतेय ही आता? हे मला नकोय. मला लग्नात हेही नकोय की, याची गाडी मिस झाली. कसा पोहोचणार हा? असं काही नकोय. त्यामुळे मला डेस्टिनेशन नाही करायचं. मुंबईत लग्न करणार. माझी मुंबई.

हेही वाचा – Bigg Boss 17: ‘बिग बॉस १७’मधून बाहेर झाली आयशा खान, जाता-जाता मुनव्वर फारुकीला म्हणाली…

दरम्यान, पूजा सावंतच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव सिद्धेश चव्हाण असं आहे. तो अभिनेता नसून एका ऑस्ट्रेलियातील एका फायनान्स कंपनीत कामाला आहे. पूजाचं हे लव्ह मॅरेज नसून अरेंज मॅरेज आहे.

Story img Loader