अभिनेत्री पूजा सावंत ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मराठी बरोबरच तिने हिंदी सिनेसृष्टीतही स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तिच्या कामाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. आतापर्यंत तिचं नाव वैभव तत्त्ववादी आणि भूषण प्रधानबरोबरही जोडले गेले आहे. आता त्या दोघांपैकी खरोखरच हिचा कोणी बॉयफ्रेंड आहे का? याचं उत्तर तिने स्वतः दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : दारू, सिगारेट नाही तर भूषण प्रधानला आहे ‘हे’ व्यसन, खुलासा करत म्हणाला…

वैभव, पूजा आणि भूषण या तिघांबद्दल आतापर्यंत अनेक चर्चा रंगल्या आहेत. वैभव आणि पूजाचा साखरपुडा झाला आहे, पूजा आणि भूषण एकमेकांना डेट करत असून त्यांनी गुपचूप साखरपुडा केला आहे अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे पूजा नक्की त्या दोघांपैकी कोणाला डेट करते आहे असा प्रश्नही अनेकांना पडला होता. आता अखेर पूजाने यावर भाष्य केलं आहे.

हेही वाचा : “ते दोघेही माझे…”, पूजा सावंतने केलं वैभव तत्त्ववादी आणि भूषण प्रधानबरोबरच्या नात्यावर स्पष्ट भाष्य, म्हणाली…

या तिघांनी नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. त्यावेळी ते तिघं म्हणाले, “अशा प्रकारच्या चर्चा आता आमच्या घरच्यांनाही खूप सवयीच्या झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना त्याचा काहीही फरक पडत नाही.” तर पूजा म्हणाली, “काही लोकांना असं वाटतं की वैभव माझा बॉयफ्रेंड आहे, तर काहींना असं वाटतं की भूषण माझा बॉयफ्रेंड आहे. पण मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की या दोघांपैकी कोणीही माझा बॉयफ्रेंड नाही. आम्ही तिघेही फक्त खूप चांगले मित्र आहोत.” तर आता पूजाच्या या बोलण्यावर तिचे, वैभवचे आणि भूषणचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pooja sawant revealed to whom she is dating vaibhav tatwawadi or bhushan pradhan rnv