मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लग्नसराईला सुरूवात झाली आहे. मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे, अमृता देशमुख-प्रसाद जवादे, स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णी या लोकप्रिय जोड्यांनंतर आता लवकरच अभिनेत्री पूजा सावंत विवाहबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर रोमँटिक फोटो शेअर करत तिने साखरपुडा झाल्याची घोषणा केली होती. अभिनेत्रीने नुकत्याच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत तिचे लग्नाबद्दलचे प्लॅन्स सांगितले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूजा सावंत पुढच्या वर्षी सिद्धेश चव्हाणशी लग्नगाठ बांधणार आहे. गुपचूप साखरपुडा केल्यावर आता अभिनेत्रीचे लग्नाचे काय प्लॅन्स आहेत? याबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाली, “माझे लग्नाबद्दल खूप प्लॅन्स आहेत. कारण, लहानपणापासूनच लग्न करायचं ही माझी मनापासून इच्छा होती. त्यात मला ‘पर्पल वेडिंग’चं विशेष आकर्षण आहे. पण, आपल्या मराठी लोकांमध्ये लग्न लागताना पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसावी लागते. मला मनातून जांभळ्या रंगाची नऊवारी नेसण्याची खूप इच्छा आहे पण, घरच्यांनी आधीच पिवळ्या साडीबद्दल सांगितलं आहे.”

हेही वाचा : ना भूषण, ना वैभव…; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीला पूजा सावंतने सांगितलेलं तिच्या लग्नाचं गुपित, म्हणाली…

पूजा पुढे म्हणाली, “जांभळ्या रंगाच्या साडीसाठी मला घरून कोणीच परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मी आपल्या परंपरा, रितीरिवाज सांभाळून लग्नाचे प्लॅन्स करणार आहे. साडीशिवाय माझ्या आई-बाबांनी मला कोणत्याचं गोष्टीचं बंधन घातलेलं नाही. कारण, सध्या सगळेजण खूप आनंदी आहेत.”

हेही वाचा : ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटावर उपेंद्र लिमयेंच्या लेकाची होती ‘ही’ प्रतिक्रिया, म्हणाला, “बाबा तुला…”

“लग्नाच्या जागेबद्दल सांगायचं झालं, तर सिद्धेशचं यावर काहीच म्हणणं नाहीये. सगळे प्लॅन्स माझे आहेत. सध्या डेस्टिनेशन वेडिंगची सर्वत्र चर्चा सुरू आहे. तसं झालं तरी चालेल पण, मला मुंबईत लग्न करायचंय. जिथे माझा जन्म झालाय, माझी जवळची माणसं मुहूर्तावर वेळेत पोहोचू शकतात त्याठिकाणी माझं लग्न व्हावं. आता सध्या जागेबद्दल काहीच ठरवलेलं नाही.” असं पूजा सावंतने सांगितलं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pooja sawant reveals her marriage plan and talks about destination wedding sva 00