कलरफुल म्हणून ओळखली जाणारी मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री पूजा सावंत लग्नानंतर अनेकदा चर्चेत आली. सध्या पूजा आणि तिचा पती सिद्धेश ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक आहेत. कारण पूजाचा नवरा ऑस्ट्रेलियातील एका फायनान्स कंपनीत कामाला आहे. लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा पूजा व सिद्धेशने ऑस्ट्रेलियात मराठी परंपरेनुसार साजरा केला. याचे फोटोज तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते आणि ते तुफान व्हायरल झाले. अशातच पूजाचा आणखी एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

पूजाने तिच्या मेहेंदी सोहळ्यातील लेहेंग्यावरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. “सलोना सा सजन है और मैं हूँ” हे आशा भोसलेजींचं गाण पूजाने या व्हिडीओत वापरलं आहे. “तुम्हाला प्रभावित करण्याची रंगांमध्ये ताकद असते”, असं सुंदर कॅप्शन पूजाने या व्हिडीओला दिलं आहे. “कलरफुल”, “तुझी स्माईल खूप गोड आहे” अश्या अनेक कमेंट्स चाहत्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.

हेही वाचा… लक्ष्मीच्या पावलांनी : नयना आणि राहुल लवकरच अडकणार लग्नबंधनात; अद्वैतच्या निर्णयाला कलाचा पाठिंबा, पाहा प्रोमो

कलरफुल लेहेंगा, भरजरी दागिने, मिनिमल मेकअप मेकअप आणि हेअरस्टाईलमध्ये पूजाचं सौंदर्य अगदी खुलून आलेलं दिसतयं. पूजाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

हेही वाचा… “ती बिलं भरायची”, अनिल कपूर यांना कठीण काळात पत्नी सुनीताने केलेली मदत; म्हणाले…

दरम्यान, अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांनी २८ फेब्रुवारी २०२४ रोजी लग्नगाठ बांधली. साखरपुडा, संगीत, मेहेंदी, हळद आणि सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्नसोहळा पाहायला मिळाला. पूजा आणि सिद्धेशच्या लग्नसोहळ्याला प्रार्थना बेहेरे, भूषण प्रधान, वैभव तत्त्ववादी, सुखदा व अभिजीत खांडकेकर अशा अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

Story img Loader