कलरफुल म्हणून ओळखली जाणारी मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांचा लग्नसोहळा २८ फेब्रुवारी २०२४ रोजी थाटामाटात पार पडला. लग्नानंतर विधिपूर्वक सत्यनारायणाची पूजा आणि मग सिद्धिविनायकाचं दर्शन घेत दोघांनी आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली. नुकतेच दोघंही हनिमूनला जाताना मुंबई विमानतळावर दिसले होते. पूजाची बहिण रुचिरा या जोडप्याला सोडायला गेली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नववधू पूजाने तिच्या हनिमूनचे फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये पूजाने सफेद रंगाचा चिकनकारी कुर्ता घातला आहे. मोकळे केस, हातात हिरवा चुडा व नो मेकअप लूकमध्ये पूजाचं सौंदर्य खुलून दिसत आहे.

दुसऱ्या फोटोमध्ये पूजाने मेंदीनं रंगलेल्या तिच्या हातांचा फोटो शेअर केला आहे. १३ दिवसांनंतरही पूजाच्या मेंदीचा रंग तितकाच उठून दिसतो आहे. या फोटोला कॅप्शन देत पूजाने लिहिलं, “अजूनही मेंदी हातावर आहे आणि हे किती सुंदर आहे”

पूजा सावंतची बहीण रुचिरा ही तिच्या बहिणीच्या साखरपुड्यापासून ते लग्नापर्यंत सगळीकडे आपली जबाबदारी पार पाडताना दिसली. आपल्या बहिणीला आणि भावोजींना विमानतळावर सोडायलाही रुचिरा गेली होती. पूजाच्या लग्नानंतर रुचिराला तिची खूप आठवण येत असते आणि तिच्या पोस्टद्वारे ती तिच्या भावना व्यक्त करताना दिसते.

आता पुन्हा एकदा रुचिराने एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यात ‘डोरेमॉन’ कार्टूनचा व्हिडीओ शेअर करीत त्यावर “आय मिस यू” अशी कॅप्शन रुचिरानं दिली आहे आणि पूजाला टॅग केलं आहे. हा व्हिडीओ रिपोस्ट करीत पूजानं “आय मिस यू टू रुचू. आलेच…” अशी कॅप्शन दिली आहे. पूजा आणि रुचिरा या दोन्ही बहिणींचं नात खूप घट्ट असल्याचं या स्टोरीवरून कळतंय.

दरम्यान, पूजा आणि सिद्धेशच्या नात्याबद्दल सांगायचं झालं, तर पूजानं एक अनोखी पोस्ट शेअर करीत तिच्या आणि सिद्धेशच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. त्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी साखरपुडा करीत पूजानं चाहत्यांना सुखद धक्का दिला. पूजा आणि सिद्धेशच्या लग्नसोहळ्याला प्रार्थना बेहेरे, भूषण प्रधान, वैभव तत्त्ववादी, सुखदा व अभिजीत खांडकेकर अशा अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pooja sawant shared honeymoon photos from a trip with her husband siddhesh chavan dvr