Pooja Sawant Romantic Reel With Husband : महाराष्ट्राची ‘कलरफुल’ अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखलं जातं. आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने प्रत्येकाचं मन जिकलं आहे. ‘दगडी चाळ’ चित्रपटामुळे पूजा घराघरांत लोकप्रिय झाली. आजच्या घडीला तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. रुपेरी पडद्यावर यश मिळाल्यावर पूजाने वैयक्तिक आयुष्यात यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस लग्नगाठ बांधली. तिचा लग्नसोहळा मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने मुंबईत पार पडला. पूजाच्या लग्नाला इंडस्ट्रीतील बरेच कलाकार उपस्थित राहिले होते.

प्रार्थना बेहेरे, गश्मीर महाजनी व त्याची पत्नी, भूषण प्रधान, वैभव तत्त्ववादी, सुखदा खांडकेकर हे पूजाचे इंडस्ट्रीमधील फार जवळचे मित्र आहेत. या सगळ्यांनी पूजाच्या लग्नात धमाल केल्याचं पाहायला मिळालं. यापैकी अभिनेता भूषण प्रधानचा एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे लाडक्या मित्रासाठी पूजाने खास पतीबरोबर रोमँटिक डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
Pooja Sawant First Makar Sankrant dance video
ऑस्ट्रेलियात पूजा सावंतचा बहिणीसह जबरदस्त डान्स! पहिल्या संक्रांतीला मराठमोळा साज, पाहा व्हिडीओ
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार
Premachi Goshta Fame Rajas Sule went on trip to new zealand with wife after wedding 19 days
लग्नाच्या १९ दिवसांनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेता ‘या’ देशात गेला फिरायला, पत्नी फोटो शेअर करत म्हणाली…
Aishwarya And Avinash Narkar dance video
नारकर जोडप्याचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! Video पाहून मराठी अभिनेत्री म्हणते, “हा ग्रुप कसा जॉईन करायचा…”

हेही वाचा : भाजलेलं कणीस अन् मित्र! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांची पावसाळी ट्रिप, वनिता खरातने शेअर केला फोटो

भूषण प्रधान मुख्य भूमिकेत असलेल्या ‘घरत गणपती’ चित्रपटातील गाण्यावर पूजाने आपल्या नवऱ्यासह रोमँटिक डान्स केल्याचं पाहायला मिळत आहे. पूजा व तिचा नवरा सिद्धेश यांचा हा सुंदर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पूजाने परदेशात शूट केल्याचं लोकेशन पाहून स्पष्ट होत आहे.

पूजा व तिच्या पतीची भूषणसाठी खास पोस्ट ( Pooja Sawant )

भूषणला शुभेच्छा देण्यासाठी पूजा व तिच्या नवऱ्याने जोडीने हा डान्स केला आहे. अभिनेत्री याबद्दल लिहिते, या गाण्यावर माझ्या जवळच्या व्यक्तीसह डान्स करण्यासाठी मी खूप वाट पाहिली. सिद्धेश व माझ्याकडून ‘घरत गणपती’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा! भूषण तुला या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा कारण, मला माहितीये तू नेहमीच सगळं बेस्ट करतो. २६ जुलैला ‘घरत गणपती’ हा चित्रपट प्रदर्शित होतोय तर, नक्की पाहा असं कॅप्शन देत पूजाने आपल्या मित्राला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : अथिया शेट्टीला चित्रपटात घेणाऱ्या कास्टिंग डायरेक्टरला सुनील शेट्टीने दिला बंगला; म्हणाला, “मुंबईतील सर्वात…”

Pooja
भूषण प्रधानच्या चित्रपटासाठी पूजा सावंतचा ( Pooja Sawant ) खास व्हिडीओ

दरम्यान, सुखदा खांडकेकर, पूजाचा भाऊ श्रेयस आणि अन्य काही नेटकऱ्यांनी पूजाचा तिच्या नवऱ्याबरोबरचा रोमँटिक अंदाज पाहून अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Story img Loader