‘दगळी चाळ’ फेम अभिनेत्री पूजा सावंत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर होणाऱ्या नवऱ्याबरोबरचे फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. आता नुकत्याच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत पूजाने तिच्या सासरच्यांबद्दल सांगितलं आहे. पूजाचं लग्न अरेंज मॅरेज पद्धतीने जमलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूजाच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव सिद्धेश चव्हाण असून तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. तिच्या होणाऱ्या सासूबाईंबद्दल सांगताना पूजा म्हणाली, “मला माझ्या सासूबाई खरंच खूप आवडतात. त्या खूपच गोड आहेत. त्यांना माझे सिनेमे सुद्धा माहिती आहेत. मी आजवर कोणती कामं केली, माझा परफॉर्मन्स कधी असतो? या सगळ्या गोष्टी त्यांच्या खूप चांगल्या लक्षात असतात. कधी-कधी मला असं वाटतं सिद्धेशपेक्षा त्यांना माझ्या कामाबद्दल अनेक गोष्टी माहिती आहेत.”

हेही वाचा : हार्दिक जोशीच्या ‘जाऊ बाई गावात’नंतर ‘झी मराठी’वर लवकरच सुरू होणार नवीन रिअ‍ॅलिटी शो, जाणून घ्या…

पूजा पुढे म्हणाली, “जसे माझे आई-बाबा मला कायम सहकार्य करतात, मला कायम प्रोत्साहन देतात. अगदी तसेच सिद्धेशचे आई-बाबा आहेत. या इंडस्ट्रीत मी जे काही नाव कमावलंय त्याचा माझ्या सासू-सासऱ्यांना प्रचंड अभिमान आहे. आपल्या कामाचा सर्वांनी आदर करावा ही गोष्ट प्रत्येक नात्यासाठी अत्यंत गरजेची असते. कारण, एखाद्या व्यक्तीशी तुमचं लग्न झाल्यावर तुम्ही संपूर्ण कुटुंबाशी जोडले जाता. त्यामुळे कौटुंबिक पाठिंबा प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो असं मला वाटतं. याबाबतीत माझे सासरचे खूप चांगले आहेत.”

हेही वाचा : मराठी अभिनेत्याचं बॉलीवूडमध्ये पदार्पण! कार्तिक आर्यनसह शेअर करणार स्क्रीन, फोटो पाहिलेत का?

“मी त्यांना भेटायला गेले होते तेव्हा सिद्धेशचे आई-बाबा, त्याचा लहान भाऊ, त्याची बायको आम्ही सगळे एकत्र राहिलो होतो. त्यांच्याबरोबर वेळ घालवल्यावर मला कधीच मी दुसऱ्या कोणत्या कुटुंबाबरोबर राहतेय असं जाणवलं नाही. त्यांचं कुटुंब खरंच खूप सुंदर आहे.” असं पूजाने सांगितलं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pooja sawant talks about her mother in law actress says she watched every film of mine sva 00