‘दगळी चाळ’ फेम महाराष्ट्राची ‘कलरफूल’ अभिनेत्री पूजा सावंत लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. साखरपुडा, व्याही भोजन, संगीत सोहळ्यानंतर नुकताच अभिनेत्रीचा मेहंदी सोहळा पार पडला. पूजा आणि सिद्धेशच्या मेहंदी सोहळ्यातील बरेच फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पूजाने मेहंदीसाठी खास पारंपरिक डिझाइन असलेला बहुरंगी लेहेंगा आणि त्यावर भरजरी दागिने परिधान केले होते. या लूकमध्ये अभिनेत्री अतिशय सुंदर दिसत होते. तिच्या मेहंदीसाठी जवळचे मित्र-मैत्रिणी, सिनेसृष्टीतील कलाकार व कुटुंबीयांनी उपस्थिती लावली होती.
हेही वाचा : “सर्रास गोळीबार, खून, ड्रग्ज”, तेजस्विनी पंडितची ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाली, “आपला महाराष्ट्र…”
पूजा व सिद्धेशच्या लग्नाची गेल्या महिन्याभरापासून चर्चा सुरू चालू होती. या दोघांचं लग्न अरेंज मॅरेज पद्धतीत जमलं आहे. लवकरच हे जोडपं विवाहबंधनात अडकणार असून नुकतीच पूजाच्या हातावर सिद्धेशच्या नावाची मेहंदी सजली आहे.
हेही वाचा : “‘साथिया’च्या सेटवर हजारोंची गर्दी जमली अन् शेवटी पोलिसांनी…”, विवेक ओबेरॉयने सांगितला किस्सा
मेहंदीआधी पार पडलेल्या पूजा-सिद्धेशच्या संगीत सोहळ्याला कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. प्रार्थना बेहेरे व तिचा पती अभिषेक जावकर, सुखदा खांडकेकर, अमृता खानविलकर, गौरी महाजनी, वैभव तत्त्ववादी असे पूजाचे जवळचे सगळे मित्र-मैत्रिणी संगीत सोहळ्यात एकत्र थिरकल्याचं पाहायला मिळालं. संगीत, मेहंदी, हळद असे सगळे विधी पार पडल्यावर येत्या दोन दिवसांत पूजा व सिद्धेश लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं जात आहे.