‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री पूजा सावंत आज आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अभिनयाबरोबरचं आपल्या नृत्य कौशल्यामुळे प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. मराठीसह हिंदीतही तिने अभिनयाच्या जोरावर स्वतःची छाप उमटवली आहे. लवकरच पूजाचा ‘मुसाफिरा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
पुष्कर जोग दिग्दर्शित, निर्मित ‘मुसाफिरा’ हा चित्रपट २ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पुष्कर, पूजा सावंतसह दिशा परदेशी, पुष्कराज चिरपुटकर, स्मृती सिन्हा पाहायला मिळणार आहेत. याच चित्रपटाच्या निमित्ताने हे सर्व कलाकार ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये सहभागी झाले होते. तेव्हा पूजा सावंतने लग्नानंतर ऑस्ट्रेलियात स्थायिक होणार की नाही? याविषयी सांगितलं.
हेही वाचा – यंदा कर्तव्य आहे! अभिनेत्री पूजा सावंतने सांगितलं कधी आणि कुठे होणार लग्न?
अभिनेत्री पूजा सावंतला ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये विचारण्यात आलं की, सिद्धेश कायम स्वरुपी ऑस्ट्रेलियात राहतो का? मग तू लग्नानंतर तिकडेच स्थायिक होणार आहे? यावर पूजा म्हणाली, “तो कायमस्वरुपी ऑस्ट्रेलियात नाहीये. तो आताच दोन वर्षांपूर्वी गेलाय. तो मुळचा मुंबईचा आहे. त्याचे आई-बाबा मुंबईत आहेत. त्यामुळे आम्ही सगळे मुंबईतचं राहणार आहोत. काही वर्षांसाठी सिद्धेश ऑस्ट्रेलियात आहे. म्हणून मी काही वर्ष येऊन जाऊन करेन. हे अरेंज मॅरेज असल्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टींसाठी तयार आहोत. त्यामुळे आमचं असं आहे, ठीक आहेना, चल बघू या. आपण करू. आपल्याला जमेल. म्हणून आम्ही फार विचार करणार नाही.”
हेही वाचा – Bigg Boss 17: ‘बिग बॉस १७’मधून बाहेर झाली आयशा खान, जाता-जाता मुनव्वर फारुकीला म्हणाली…
दरम्यान, पूजा सावंत यंदाच लग्नबंधनात अडकणार आहे. मराठी रितीरिवाजानुसार पूजाचा लग्नसोहळा होणार आहे. तसंच हे डेस्टिनेशन वेडिंग नसून मुंबईत होणार असल्याचं पूजा सावंतने स्पष्ट केलं आहे.