नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये गाजलेलं नाव म्हणजे भरत जाधव. भरत जाधव यांनी मालिका, चित्रपट यांच्यापेक्षा नाट्यसृष्टीत अधिक काम केलं आहे. नाट्यसृष्टीमध्ये त्यांचं नाव अत्यंत अदबीनं घेतलं जातं. स्वतःचं आयुष्य नाट्यकलेला वाहिलेल्या कलाकारांपैकी एक भरत जाधव आहेत. त्यांच्या ‘सही रे सही’ नाटकाला २१ वर्षं पूर्ण झाली असूनही या नाटकाला अजूनही प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. आता नाट्यरसिक प्रेक्षकांसाठी भरत जाधव यांनी नव्या नाटकाची घोषणा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – “दीड वर्षापूर्वीच्या ‘त्या’ दिवशी…”; किरण मानेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष, म्हणाले, “काट लो जुबान…”

सध्या भरत जाधव यांची ‘तू तू मी मी’, ‘सही रे सही’, ‘मोरूची मावशी’ ही नाटकं सुरू आहेत. आता त्यांचं नवं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यासंबंधीचा व्हिडीओ भरत जाधव यांनी सोशल मीडियावर शेअर करीत ‘लवकरच’ असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

हेही वाचा – ‘सुभेदार’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा बदलली, कारण सांगत चिन्मय मांडलेकर म्हणाला…

या व्हिडीओत लिहिण्यात आलं आहे की, “रसिक प्रेक्षकहो, आपणा सर्वांच्या आशीर्वादानं ‘सही रे सही’ला आज २१ वर्ष पूर्ण होत आहेत. आपल्या लाडक्या भरत’नं मागील ३० वर्षं आपणा सर्वांना खळखळून हसवल्यानंतर तो आपल्यासमोर पुन्हा येत आहे… पण यंदा हसवायला नाही तर आपल्याला हळवं करायला… नवं नाटक घेऊन… कधीही न पाहिलेल्या नव्या भूमिकेत… भरत जाधव एंटरटेन्मेंट सादर करीत आहे ‘अस्तित्व’.

हेही वाचा – “डान्सर असल्यामुळे मराठी इंडस्ट्रीत…”, अभिनेत्रीने खंत व्यक्त करत सांगितला अनुभव, म्हणाली…

भरत जाधव यांची ही पोस्ट पाहताच चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया देत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. एका चाहत्यानं लिहिलं आहे, “वाट बघत आहोत भरत सर. पण, शिवाजी मंदिर दादरमध्ये पहिला प्रयोग करा.” तर दुसऱ्या चाहत्यानं लिहिलं आहे, ‘नवीन चित्रपट येऊ द्या.’

दरम्यान,आता भरत जाधव यांचं हे नवे नाटक कधीपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आणि कोणत्या नव्या भूमिकेत ते दिसणार हे येत्या काळात समजेल.