मराठी सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी आपल्या कामाने हिंदीत एक वेगळी छाप उमटवली आहे. सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर, अनुजा साठे, क्षिती जोग, अमेय वाघ, जितेंद्र जोशी अशा अनेक कलाकारांनी हिंदीत उत्तम अभिनयानं आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्याप्रमाणे बऱ्याच हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन देखील मराठी कलाकारांनी केलं आहे. महेश मांजरेकर, समीर विद्वांस, ओम राऊत यांसारख्या अनेक मराठीतील लोकप्रिय दिग्दर्शकांनी हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. तसेच मराठी दिग्दर्शकांच्या हाताखाली तयार झालेले बरेच हिंदी चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आहेत. अशाच एका लोकप्रिय दिग्दर्शकाचा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिर्डी एस. टी स्टॅन्डवरचा हा फोटो आहे.
हेही वाचा – ‘ढोलकीच्या तालावर’च्या निकालावर प्रेक्षक नाराज; म्हणाले, “शुभम बोराडेचं विजेता…”
हे लोकप्रिय दिग्दर्शक म्हणजे रवी जाधव आहेत. रवी जाधव यांनी काही वेळांपूर्वी बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत मधे उभे असलेले रवी जाधव आहेत. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहीलं आहे की, “लय जूना फोटो…. मोठा भाऊ राजेंद्र आणि बहीण वैशाली बरोबर शिर्डी एस. टी. स्टॅन्डवर…”
हेही वाचा – ‘या’ चिमुकल्यांना ओळखलंत का? एक आहे मराठीतील आघाडीची अभिनेत्री तर दुसरी भारतातील प्रसिद्ध खेळाडू
हेही वाचा – “मी लग्न केलं…” केतकी माटेगावकरचा खुलासा, म्हणाली, “माझा पहिला नवरा…”
दरम्यान, रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेली ‘ताली’ वेब सीरिज अलीकडेच प्रदर्शित झाली होती. या वेब सीरिजला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी लढणाऱ्या सामजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित ‘ताली’ वेब सीरिज आहे. बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री सुश्मिता सेन हिनं गौरी सावंत यांची भूमिका निभावली आहे.