मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दिग्दर्शनाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे समीर विद्वांस लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. जुईली सोनलकरबरोबर समीर विद्वांस लग्नगाठ बांधणार आहेत. काही दिवसांपूर्वी मराठीतील कलाकार मंडळींनी समीर व जुईली यांचं केळवण केलं होतं. याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. अभिनेता हेमंत ढोमे, क्षिती जोग, चिन्मय मांडलेकर, नेहा मांडलेकर, लोकेश गुप्ते, चित्राली गुप्ते यांनी आपल्या कुटुंबासह समीर व जुईलीचं पारंपरिक पद्धतीनं केळवण केल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता समीर यांच्या हळदी समारंभाचे फोटो समोर आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घरीच साध्या पद्धतीनं समीर विद्वांस यांचा हळदी समारंभ पार पडला आहे. समीर यांनी स्वतः आणि इतर कलाकारांनी त्यांच्या हळदीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. समीर विद्वांस यांनी स्वतः शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये ते साध्या टी-शर्टवर टोपी घालून हळदीसाठी तयार झालेले पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये चिमुकला पुतण्या दिग्दर्शकाला हळद लावताना दिसत आहे.

हेही वाचा – Video: नीता अंबानींनी मुलाच्या लग्नासाठी वारासणीतून खरेदी केली साडी, सोन्या-चांदीचे वर्क असलेल्या साडीची किंमत जाणून घ्या

तिसरा फोटो लोकेश गुप्ते यांच्या लेकीनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. यामध्ये समीर विद्वांस यांचं औक्षण होताना पाहायला मिळत आहे. तर चौथा फोटो चैत्राली गुप्तेनं शेअर केला असून त्यामध्ये समीर यांना हळद लागली दिसत आहे. या फोटोमध्ये चैत्रालीसह लेक शुभावी व क्षिती जोग वगैरे पाहायला मिळत आहेत.

समीर विद्वांस यांची होणारी पत्नी जुईलीनं देखील इन्स्टाग्राम स्टोरीवर मेहंदी समारंभाचे फोटो शेअर केले होते. तसंच लग्नासाठी सुरू असलेल्या डान्स तयारीचा व्हिडीओ देखील तिनं इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता.

हेही वाचा – Video: ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील ‘ही’ चूक कधी तुम्हाला लक्षात आली का? व्हिडिओ होतोय व्हायरल

दरम्यान, १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी समीर विद्वांस व जुईली सोनलकर यांचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा झाला होता. सोशल मीडियावर जुईलीनं साखरपुड्याचा फोटो शेअर करून सगळ्यांनाच सुखद धक्का दिला होता. समीर विद्वांस यांची होणारी पत्नी देखील सिनेसृष्टीत काम करते. गेल्या अनेक वर्षांपासून दोघांची चांगली मैत्री होती; ज्याचं प्रेमात रुपांतरित झालं. आता दोघं संसार थाटण्यासाठी तयार झाले आहेत. येत्या काही दिवसांत दोघं लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Popular marathi director sameer vidwans haldi ceremony photos viral pps