लोकसंगीताचा वारसा लाभलेल्या शिंदेशाहीचं सध्या चुहूबाजूने कौतुक केलं जात आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर शिंदे कुटुंबाने उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवतं पंढरपूर येथील वेळापूरमध्ये पेट्रोल पंप सुरू केलं आहे. ‘आदर्श आनंद शिंदे’ असं या पेट्रोल पंपला नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या शिंदे कुटुंबाने उचलेल्या या पावलाचं कौतुक केलं जात आहे. अशातच आदर्श शिंदेच्या लेकीचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे; ज्यामध्ये आदर्शची लेक काका म्हणजेच उत्कर्ष शिंदेबरोबर किल्ला बनवताना दिसत आहे.
गायक, अभिनेता, डॉक्टर उत्कर्ष शिंदेनं नुकताच सोशल मीडियावर अंतरा आदर्श शिंदेचा किल्ला बनवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये काका आणि पुतणी मस्त किल्ला बनवताना पाहायला मिळत आहे. तसंच काका पुतणीला किल्ल्यासंदर्भातील माहिती देताना देखील दिसत आहे. उत्कर्षने हा व्हिडीओ शेअर करत भलीमोठी एक सुंदर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
हेही वाचा – ‘या’ चिमुकल्यांना ओळखलंत का? सध्या प्रेक्षकांच्या मनावर गाजवतायत अधिराज्य
उत्कर्ष शिंदेची पोस्ट वाचा…
“मातीत कस राहिला नाही तर पीक कसदार येत नाही”
आजची पिढी संस्कृती विसरत चाललीये असं कैक लोक सरास म्हणताना ऐकू येतात. पण, त्यातले किती जण तीच पिढी घडविण्यासाठी आपला वेळ देतात? किती जण लहान मुलांच्या प्रश्नांना शांतपणे बालिश न म्हणता समजूतदार पणे उत्तर देतात? आणि किती जण मीच खूप व्यस्त असतो हे उत्तर देऊन पळ काढण्यापेक्षा त्या लहानग्या मुलांना संस्कार घडविण्यासाठी प्रयत्नशील असतात? हातात मोबाईल दिला आणि आपल्या मागची किटकिट संपली असा मानणाऱ्यांनो. हे लक्षात ठेवा. “मातीत कस राहिला नाही ना तर पीक कसदार येत नाही” महाराष्ट्र हे सणांचा संस्कृतीने नटलेलं राज्य आहे.
लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाला या सण-उत्सवाची ओढ असते. या उत्सवादरम्यानच्या, अनेक प्रथा-परंपरा प्रचलित आहे. लहान मुलांसाठी तर हा सण आनंदाच्या पर्वणीपेक्षा कमी नाही. दीपदानोत्सव असो की दीपावली की पाडवा. या सर्व गोष्टींची माहिती देऊन या ओल्या मातीला आकार देऊन सुंदर मूर्ती घडविण्याचं काम आपलं नाही का? या सणात किल्ले तयार करण्याची आपल्या महाराजांची आपल्या मावळ्यांची शौर्य गाथा सांगून या आधुनिक पिढीत ‘क्रेझ’ आपण निर्माण नाही करायची का? की स्पायडर मॅन, आयर्न मॅन हेच त्यांच्या मनावर बिंबवू द्यायचं? आपल्या पूर्वजांनी केलेला इतिहास न वाचता न समजून घेता नवा इतिहास या नव्या पिढ्यांना घडवता येईल का?
काल माझी पुतणी अंतरा आदर्श शिंदेबरोबर गावी किल्ला सजावट करत बरंच काही चर्चा करत तिला शिकवता आलं. आमच्या शिंदेशाही परिवारात थोर पुरुषांचे विचार वाचून त्यावर विज्ञानवादी चर्चा करण्यावर जास्त भर दिला जातो. आणि मी घरी असलो की मैदानी खेळ क्रिकेट, पकडा पकडी, ट्रेकिंग, मुलांबरोबर डान्स, फायटिंग टास्क, ड्रॉईंग, पेंटिंग मस्ती सुरू राहते. आपली एनर्जी डबल होतेच पण त्यांना ही त्यांचं लहानपण छान एन्जॉय करता येतं. आपली पिढी हसत खेळत मज्जा करत वाढू द्या. आज या बालदिना निमित्ताने आपली पिढी विज्ञानवादी घडवूया. लक्षात ठेवा. “पीढ़ियां पढ़ेगी तभी आगे बढ़ेगा”
हेही वाचा – Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील सई कोणाची निवड करणार सागर की सावनीची? पाहा मालिकेचा नवा प्रोमो
दरम्यान, उत्कर्षच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो बिग बॉस मराठीमुळे अधिक प्रकाश झोतात आला. आता तो लवकरच लोकप्रिय दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. वीर सूर्याजी दांडकर यांच्या भूमिकेत उत्कर्ष दिसणार आहे.