आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी केतकी माटेगावकर हिने आपल्या अभिनयानेदेखील प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. ‘तानी’, ‘टाईमपास’, ‘फुंतरू’ यांसारख्या चित्रपटांमधून तिनं आपलं अभिनयकौशल्य दाखवलं आहे. आता ती पुन्हा एकदा आपल्या अभिनयाचा जलावा दाखवण्यासाठी ‘अंकुश’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर आणि म्युझिक लाँच सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी केतकीनं मराठी चित्रपटाबद्दल केलेलं एक विधान सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे.

हेही वाचा – “…यासाठी मराठी माणसानं महाराष्ट्र सोडला पाहिजे”; ‘सुभेदार’ फेम अजय पुरकरांचं वक्तव्य, म्हणाले…

Kiran Mane
“डोळ्यात पाणी आलं…”, किरण माने यांनी सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाले, “माझ्यासारख्या मराठी अभिनेत्याला…”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Sameer Paranjape
‘थोडं तुझं थोडं माझं’ फेम समीर परांजपेने गायलं हटके स्टाईलने ‘नाच रे मोरा’ गाणं; नेटकरी म्हणाले, “विचार नव्हता केला…”
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
Aishwarya Narkar
“जर मला डिवचलं, तर मी…”, ऐश्वर्या नारकर ट्रोल करणाऱ्यांच्या बाबतीत करतात ‘ही’ गोष्ट; म्हणाल्या, “काय दिवे…”

‘अंकुश’ या चित्रपटातून गायिका-अभिनेत्री केतकी माटेगावकर प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. ओमकार फिल्म क्रिएशन्स निर्मिती संस्थेच्या राजाभाऊ आप्पाराव घुले यांची पहिली निर्मिती असलेला ‘अंकुश’ हा बिगबजेट चित्रपट आहे. ६ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यानिमित्तानं केतकीनं एक विधान केलं.

हेही वाचा – प्रसाद ओकच्या ‘या’ आगामी चित्रपटात झळकणार गौरव मोरे; फिल्टरपाड्याच्या बच्चनने स्वतः केला खुलासा

केतकी म्हणाली की, “मला आज खूप आनंद होतोय की, मराठी चित्रपटाबद्दलचा जो मोठा भ्रम होता तो आज राजाभाऊ घुले यांनी मोडून काढला आहे. कोण म्हणतं की, मराठी चित्रपटाला बजेट नसतं. एक अत्यंत बिगबजेट मराठी चित्रपट झालेला आहे आणि तसा दिसला आहे. यामागे सगळ्यांची मेहनत आहे. या चित्रपटाचा मला भाग होता आलं आणि मला ती संधी मिळाली याचा मला खरंच खूप आनंद आहे.”

हेही वाचा – Video: ‘सुभेदार’बद्दल प्रेक्षकांच्या ‘त्या’ कृतीमुळे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर नाराज; म्हणाले, “तुम्ही सगळे…”

दरम्यान, ‘अंकुश’ या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची धुरा निशांत नाथाराम धापसे यांनी सांभाळली आहे. या चित्रपटात केतकी व्यतिरिक्त दीपराज, सयाजी शिंदे, मंगेश देसाई, शशांक शेंडे, भारत गणेशपुरे, नागेश भोसले, गौरव मोरे, चिन्मय उदगीरकर, ऋतुजा बागवे, पूजा नायक अशी जबरदस्त कलाकार मंडळी आहेत.

Story img Loader