लोकप्रिय गायक आदर्श शिंदे याने आपल्या दमदार आवाजाने प्रेक्षकांनी मनं जिंकली आहेत. मराठीबरोबर आदर्शने बरीच हिंदी गाणी सुद्धा गायली आहेत. सध्या तो ‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद २’ या ‘स्टार प्रवाह’वरील कार्यक्रमात परीक्षण करताना दिसत आहे. नुकतीच त्यानं भाऊ उत्कर्ष शिंदेविषयी पोस्ट शेअर करत त्याचा खास गुण सांगितला आहे.
आदर्शने उत्कर्षबरोबरचा एक फोटो शेअर करत ती पोस्ट लिहिली आहे. या फोटोमध्ये उत्कर्ष झोपलेला दिसत असून आदर्श त्याच्याबरोबर फोटो काढताना दिसत आहे. हाच फोटो शेअर करत आदर्शने लिहिलं आहे की, “सतत प्रवासात झोपणारा माझा भाऊ. डेस्टिनेशन (गंतव्यस्थान)वर पोहोचेपर्यंत झोपतो. गाडी थांबली की, खूप काही खायला आणतो आणि कोणी ही खात नाही म्हटल्यावर चिडतो. मग स्वत:ला हवं ते खातो आणि पुन्हा झोपतो…प्रवासातली बेस्ट कंपनी (चांगला साथीदार) आहे… पोहोचल्यावर सगळ्यांना हे ही सांगतो “पूर्ण वेळ मीच गाडी चालवली खूप थकलोय” आणि आमचं मग असं होतं”
हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीला ‘या’ अभिनेत्रीची येतेय आठवण; फोटो शेअर करत म्हणाली…
आदर्शच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक चाहता म्हणाला की, “अगदी खरं आहे हे. माझा पण हाच अनुभव आहे.” तर दुसऱ्या चाहता म्हणाला की, “बरोबर आहे, तेच चालवत होते पण स्वप्नात. त्याच्यात काय चुकीच नाही, तरी पण जू लिहीलंय ते खूप गमतीशीर आहे.”
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/08/image-132.png)
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/08/image-133.png)
हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीला ‘नवरा मिळाला’; व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
दरम्यान, उत्कर्षच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो बिग बॉस मराठीमुळे अधिक प्रकाश झोतात आला. आता तो लवकरच महेश मांजरेकरांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. वीर सूर्याजी दांडकर यांच्या भूमिकेत उत्कर्ष दिसणार आहे. तसेच नुकतंच त्याचं ‘मी कार्यकर्ता’ हे नवं गाणं प्रदर्शित झालं आहे.