बाप-लेकाच्या नात्याचं भावनिक विश्व रंगवणाऱ्या ‘बापल्योक’ चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. नागराज मंजुळे यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी गाजत आहेत. विशेष म्हणजे लोकप्रिय संगीतकार, गायक अजय गोगावलेच्या आवाज असलेलं ‘उमगाया बाप रं’ हे गाणं प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडलं आहे. १ मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज या गाण्याला मिळाले आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये ‘उमगाया बाप रं’ हे संगीतबद्ध करणारे विजय गवंडे यांनी या गाण्यामागचा किस्सा सांगितला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “नाश्ता होईपर्यंत अचानक…”, दिग्पाल लांजेकरांना चाहत्यानं दिलं सरप्राइज; अनुभव सांगत म्हणाले…

‘आटपाट’ या युट्यूब चॅनेलद्वारे ‘बापल्योक’ चित्रपटाच्या टीमबरोबर खास गप्पा रंगल्या. या गप्पांमध्ये आपल्या वडिलांविषयी सांगताना बरेच कलाकार भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. यादरम्यान दिग्दर्शक मकरंद माने आणि संगीतकार विजय गवंडे यांनी ‘उमगाया बाप रं’ या गाण्यामागचा किस्सा सांगितला.

हेही वाचा – “माझ्या कुटुंबात मी फक्त एकटाच देसाई आहे”; मंगेश देसाई यांनी सांगितलं आडनावामागचं रहस्य; म्हणाले…

दिग्दर्शक मकरंद माने म्हणाले की, “बापाच्या गाण्याबद्दल सांगतो. मी व्हिज्युअल शूट करत होतो. थोडं-थोडं गाणं आमच्यापर्यंत येत होतं. पण पूर्ण गाणं येईपर्यंत शूट करण्यासाठी वेळ नव्हता. त्या गाण्याचे पहिले वीस-तीस सेकंद दिले होते. त्यावर मी गाण्याचं अख्ख व्हिज्युअल शूट केलं. आता या व्हिज्युअलनुसार तुला (विजय गवंडे) संगीत करायचं आहे आणि ते पाहून गाणं कसं लिहायचं आहे हे तुमचं तुम्ही बघा, असं मी यांना थेट सांगितलं. मला तुम्ही शूटिंगला गाणं नाही दिलं. त्यामुळे आता तुम्हाला याच्यावरच गाणं उभं करायचं आहे. रफ एडिट करून यांना दिलं होतं. त्याच्यावर यांनी गाणं लिहिलं आणि संगीतबद्ध केलं.”

हेही वाचा – “…म्हणून क्रांती नाव ठेवलं”; अभिनेत्रीनं स्वतः सांगितला यामागचा किस्सा

त्यानंतर संगीतकार विजय गवंडे म्हणाले की, “गुरुनं (गुरू ठाकूर) एक गोष्ट सांगितली होती. या गाण्यात ‘ऐक त्याची धाप रं’ ही ओळं आहे. त्याबद्दल त्यानं सांगितलं होतं. जेव्हा त्याचे वडील गेले, तेव्हा त्यांना धाप लागली होती; तो त्यांंना खाली घेऊन येत होता, पण त्याच्या हातातच त्यांचं निधन झालं. त्यानं ते त्या गाण्यातून मांडलं. अजय सुद्धा गाताना म्हटला होता की, माझ्याही वडिलांना शेवटी धाप लागली होती. त्यामुळे अजय गाणं गाताना जेव्हा ‘धाप रं’ हा शब्द आला होता, तेव्हा तो भावूक झाला होता.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Populer singer ajay gogavale was emotional while singing the song umagaya baap ra from bapalyok marathi movie pps
Show comments