गेल्या काही दिवसांपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकार नवनवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. लवकरच प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशी, प्राजक्ता माळी, प्रार्थना बेहेरे, प्रथमेश शिवलकर, रोहित माने, वनिता खरात अशी तगडी कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत. सध्या या चित्रपटातील एक गाणं खूप चर्चेत आहे. त्याच गाण्यावर प्राजक्ता माळी आणि मृण्मयी देशपांडेने जबरदस्त डान्स केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि मृण्मयी देशपांडेचा हा जबरदस्त डान्स व्हिडीओ प्राजक्ताच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये प्राजक्ता गुलाबी रंगाच्या नऊवारीमध्ये तर मृण्मयी केशरी रंगाच्या नऊवारीत दिसत आहे. दोघी मराठमोळ्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये प्राजक्ता व मृण्मयी ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटातील ‘बुम बुम बोंबला’ गाण्यावर डान्स करत आहेत. या गाण्यातील हुकस्टेप दोघी करताना दिसत आहेत. प्राजक्ता व मृण्मयीचा हा डान्स व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे.

प्राजक्ता माळी व मृण्मयी देशपांडेच्या या डान्स व्हिडीओवर अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आतापर्यंत एक लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहायला आहे. तसंच पाच हजारांहून अधिक जणांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.

दरम्यान, २८ फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटात अभिनेत्री नम्रता संभेरावचा कॅमिओ आहे. या कॅमिओबद्दल नम्रता म्हणाली होती, “‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटात माझा छोटा कॅमिओ आहे. अवघ्या चार वाक्यांची भूमिका आहे. ही छोटी भूमिका खूप मोठा परिणाम करते. तर आता मी वेगळं काम केलं आहे, जे चार वाक्यात संपणार आहे. पण अत्यंत महत्त्वाचं काम केलंय. प्रसादचे मला मनापासून आभार मानायचे आहेत.”