लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. प्राजक्ताचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. ती तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. अनेकदा ती तिच्या फोटोशूटमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करते, त्याबरोबरच मजेदार कॅप्शनही देते. प्राजक्ताने नुकत्याच केलेल्या एका पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे.
‘तुम पुकार लो, तुम्हारा इंतजार है’ या जुन्या गाण्यातील ‘मुख़्तसर सी बात है..तुमसे प्यार है…तुम्हारा इंतज़ार है,’ या ओळी कॅप्शनमध्ये लिहित प्राजक्ताने तिचे सुंदर फोटो बुधवारी पोस्ट केले होते. त्यानंतर आता पुन्हा तिने त्याच फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंबरोबर तिने पुन्हा ‘तुम पुकार लो, तुम्हारा इंतजार है’ याच गाण्यातील ‘दिल बहल तो जाएगा
इस ख़याल से..।
हाल मिल गया तुम्हारा
अपने हाल से..।
रात ये करार की
बेक़रार है ।
तुम्हारा इंतज़ार है..।” या ओळी शेअर केल्या. तसेच हे गाणं आपण सातत्याने ऐकत असल्याने ड्रायव्हर वैतागला असल्याचं म्हटलं आहे. “गाडीमध्ये हे गाणं ऐकून माझा ड्रायव्हर वैतागलाय. मोबाईल ब्लूटूथ कारला कनेक्ट कर रे म्हटल्यावर दुर्लक्ष करतो,” असं तिने म्हटलं आहे.
दरम्यान, प्राजक्ताच्या या फोटोवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. फोटोत सुंदर दिसत आहेस प्राजक्ता, अशा कमेंट्स काहींनी केल्या आहेत. तर काहींनी रेड हार्ट इमोजी कमेंट केले आहेत.