Phullwanti Movie Box Office Collection : प्राजक्ता माळीचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला ‘फुलवंती’ शुक्रवारी (११ ऑक्टोबर रोजी) प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटासाठी प्राजक्ता माळी, गश्मीर महाजनी व इतर कलाकारांच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे. मात्र, असं असलं तरी प्राजक्ताच्या चित्रपटाच्या कमाईची आकडेवारी फार चांगली नाही. पाच दिवसांत या चित्रपटाने किती कलेक्शन केले, ते जाणून घेऊयात.

पेशवाई काळातील ‘फुलवंती’ नावाची सुप्रसिद्ध नर्तिका आणि प्रकांडपंडीत व्यंकटशास्त्री यांची दमदार कथा असलेली आणि देखण्या कलाविष्काराने सजलेली ‘फुलवंती’ मराठी सिनेसृष्टीतील भव्यदिव्य कलाकृती आहे. चित्रपट भव्यदिव्य असला तरी त्याच्या कमाईचे आकडे फार चांगले नाहीत.

हेही वाचा – “ती मला सहन…” घटस्फोटाबाबत प्रसिद्ध अभिनेत्याचं वक्तव्य; दुसऱ्या पत्नीबद्दल म्हणाला, “मी तिला चार महिने…”

‘फुलवंती’चे कलेक्शन किती?

इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या वृत्तानुसार, ‘फुलवंती’ चित्रपटाने पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी फक्त ८ लाख रुपये कमावलेत. तर, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. शनिवारी चित्रपटाने ३६ लाख कमावले. तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सिनेमाने ७५ लाखांची कमाई केली. चौथ्या दिवशी या चित्रपटाने १६ लाख रुपयाचे कलेक्शन केले. तर पाचव्या दिवशी या सिनेमाने १९ लाख रुपयांचा गल्ला जमवला. या चित्रपटाने पाच दिवसांत १.५४ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. दरम्यान, चित्रपटाच्या टीमने अद्याप अधिकृत आकडेवारी दिलेली नाही.

हेही वाचा – Bigg Bossच्या पहिल्याच एपिसोडला ऐतिहासिक TRP! अभिनेत्याची मोठी घोषणा; म्हणाला, “होस्ट म्हणून शेवटचा सीझन…”

Phullwanti Movie Box Office Collection
फुलवंती चित्रपटाचे पोस्टर (फोटो-पीआर)

हेही वाचा – Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्तेंची अचानक शोमधून एक्झिट! नेमकं काय घडलं? ते बिग बॉसच्या घरात परतणार का? वाचा

या चित्रपटाचे संवाद लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडेंनी केले आहे. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. अविनाश- विश्वजीत यांनी संगीताची धूरा सांभाळली आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. तर अमोल जोशी प्रोडक्शन, मुरलीधर छतवानी,रविंद्र औटी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते विक्रम धाकतोडे आहेत. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.