Marathi Actress Prajakta Mali : ‘जुळून येती रेशीमगाठी’ ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर २०१३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेने जवळपास दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. यामधून दोन नवीन चेहरे घराघरांत लोकप्रिय झाले. पहिला आदित्यची भूमिका साकारणारा ललित प्रभाकर आणि दुसरी मेघनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी. या मालिकेच्या यशानंतर अभिनेत्रीने पुन्हा कधीच मागे वळून पाहिलं नाही. मेहनतीच्या जोरावर प्राजक्ताने आज यशाचा मोठा टप्पा गाठत तिच्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

प्राजक्ता माळीची ( Prajakta Mali ) निर्मिती असलेला पहिला चित्रपट येत्या ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘फुलवंती’ चित्रपटात तिच्यासह अभिनेता गश्मीर महाजनीने प्रमुख भूमिका साकारली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि संपूर्ण कलाविश्वातून अभिनेत्रीवर सध्या कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. प्रसिद्ध लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांनी याचनिमित्ताने प्राजक्ता माळीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

Marathi actress tejashri Pradhan talk about her future life partner
अभिनेत्री तेजश्री प्रधानला ‘असा’ हवाय जोडीदार, म्हणाली, “फक्त नात्यात…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ashwini Mahangade
“तरीही हिमतीने रणांगणावर…”, अभिनेत्री अश्विनी महांगडे फोटो शेअर करीत काय म्हणाली?
Kavita Medhekar
“चांगल्या घरातील मुली नाटकांत…”, कविता मेढेकर यांनी अभिनयात काम करण्याची परवानगी मागितल्यावर वडिलांची ‘अशी’ होती प्रतिक्रिया; म्हणाल्या…
Loksatta lokrang Shyam Benegal A Person A Director book written by Dr Savita Nayakmohite published
स्त्रीत्वाची ताकद जाणणारा चित्रकर्ता
Marathi Actress Prajakta Mali was honored with the Sunitabai Smriti Literary Award as a poetess
Video: अभिनेत्री प्राजक्ता माळीचा नवोदित कवयित्री म्हणून सन्मान, पोस्ट करत म्हणाली, “हे दुर्मिळ…”
People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी

हेही वाचा : “तुझा नवरा कोण आहे?” चाहत्याच्या प्रश्नानंतर अखेर अंकिताने जाहीर केली तारीख! ‘या’ दिवशी करणार होणाऱ्या नवऱ्याचा खुलासा

मधुगंधा कुलकर्णी यांची प्राजक्ता माळीसाठी खास पोस्ट

मधुगंधा लिहितात, ‘जुळून येती रेशीमगाठीच्या सेटवर हिरोईन म्हणून आलेली गोलाकार चेहऱ्याची शाळकरी मुलगी वाटावी अशी ही पोरं…प्राजक्ता माळी! आज डान्सर, अँकर, अभिनेत्री म्हणून सगळीकडे गाजत असताना, निर्माती व्हावं असा निर्णय तिने घेणं याचंच मला कौतुक आहे. चित्रपट निर्मिती ही अत्यंत किचकट, अवघड प्रक्रिया आहे. अनंत अडचणी, अनेक व्याप, कटकटी व्यवधान असतात. पण, सगळं तू पेललंलस, झेललंस… अडचणी आल्या पण तू खंबीरपणे निभावून नेलंस… आणि आज तुझी निर्मिती असलेला पहिला चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. किती भारी वाटतं! ट्रेलर छान आहे, लोकांना चित्रपटही खूप आवडेल अशी खात्री आहे. मराठी चित्रपट खूप चालावेत , आपल्या मराठी मानाचा झेंडा अटकेपार फडकावा असं नेहमी वाटतं. खूप अभिमान , खूप प्रेम आणि आभाळभर शुभेच्छा!!

तर, लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर प्राजक्ताबद्दल ( Prajakta Mali ) लिहिते, “तुझ्या नव्या चित्रपटात नवीन भूमिका साकारत, अभिनेत्री म्हणून आणि निर्माती म्हणून इतकं सगळं जुळवून आणणं हे खरंच मोठं काम आहे. हा प्रवास सोपा नाही. अनेक अडचणी, आव्हानं आणि कठीण परिस्थितींचा सामना करत, तू तुझ्या कलेवर आणि संकल्पनेवर विश्वास ठेऊन हे साकार केलं आहेस. आता हा चित्रपट लोकांच्या भेटीला येत आहे, ही गोष्ट तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण टीमसाठी अत्यंत गर्वाची आहे”

हेही वाचा : ‘सिंघम अगेन’चा जबरदस्त ट्रेलर पाहिलात का? ५ मिनिटांचा ट्रेलर कापण्यासाठी रोहित शेट्टीने घेतले तब्बल ‘एवढे’ दिव

Prajakta Mali
प्राजक्ता माळीसाठी खास पोस्ट ( Prajakta Mali )

दरम्यान, प्राजक्ता माळीचा ( Prajakta Mali ) बहुचर्चित ‘फुलवंती’ चित्रपट येत्या ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय जादू करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Story img Loader