अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या ‘फुलवंती’ ( Phullwanti Movie ) चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून साकारलेली ‘फुलवंती’ ही अलौकिक कलाकृती चित्रपटरुपात मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे. प्रविण तरडे यांची पत्नी स्नेहल तरडेने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर प्रविण तरडे यांनी लेखकाची धुरा सांभाळली आहे. ११ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या ‘फुलवंती’ चित्रपटाला प्रक्षेकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच प्राजक्ता माळीने एक व्हिडीओ शेअर केला; जो सध्या चांगलाच चर्चेत आहे.
काही दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात ‘फुलवंती’ चित्रपटाच्या टीमने हजेरी लावली होती. यावेळी गश्मीर महाजनी, स्नेहल तरडे, हृषिकेश जोशी उपस्थित राहिले होते. यादरम्यान प्राजक्ता माळीने स्नेहल तरडे आणि हृषिकेश जोशीबरोबर एक खेळ खेळला. ज्याचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये, कलाकार तळ्यात मळ्यात खेळ खेळताना दिसत आहे. पण यामध्ये एक ट्विस्ट आहे. तो म्हणजे प्राजक्ता माळी तळ्यात मळ्यात बोलण्याऐवजी पखवाज आण घंगुरू असं म्हणताना दिसत आहे. या अनोख्या खेळात स्नेहल आणि हृषिकेश यांनी सहभाग घेतला. शेवटपर्यंत दोघांपैकी कोणीही हरलं नाही. त्यामुळे प्राजक्ताने नंतर खेळचं थांबवला.
हेही वाचा – रुपाली भोसले आणि कुशल बद्रिकेची अचानक झाली भेट, अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली, “या मुलात जरा सुद्धा…”
या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. “दिग्दर्शक निर्मातीच्या तालावर नाचताना”, “हृषिकेश सर हुशार आहेत. समोर लक्ष ठेवून खेळत आहेत म्हणून हरत नाहीयेत”, “सुंदर”, “छान”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.
दरम्यान, प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘फुलवंती’ चित्रपटाने आतापर्यंत चांगली कमाई केली आहे. sacnilk माहितीनुसार, ‘फुलवंती’ चित्रपटाने आतापर्यंत ३.४२ कोटींचा गल्ला जमवला आहे.
© IE Online Media Services (P) Ltd