अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali)ने मालिका, चित्रपटांमधून अभिनय केला आहे. त्याचप्रमाणे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. नृत्यासाठीदेखील तिला ओळखले जाते. आता प्राजक्ता माळीची प्रमुख भूमिका असलेला ‘फुलवंती’ (Phullwanti) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘फुलवंती’ चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी या कलाकारांनी एक मुलाखत दिली. त्यावेळी प्राजक्ताने तिचे फुलवंती पात्र नेमके कसे आहे, काय भूमिका आहे याबद्दल खुलासा केला आहे.

priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Marathi actress Neelam Shirke Why did leave the acting field
एकेकाळी टॉपला असणारी नीलम शिर्के इंडस्ट्रीपासून का दूरावली? सध्या काय करते? जाणून घ्या…
ED quiz actress Gehena Vasisth in financial fraud probe
अभिनेत्री गहना वशिष्ठची ईडीकडून चौकशी
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…

‘फुलवंती’विषयी प्राजक्ता म्हणाली…

प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांनी ‘न्यूज १८ लोकमत’ला नुकतीच मुलाखत दिली. त्यावेळी प्राजक्ता साकारत असलेल्या फुलवंती या पात्राविषयी बोलताना अभिनेत्रीने म्हटले, “फुलवंती ही एक नर्तिका आहे. एक मराठी अत्यंत अभिमानी, स्वाभिमानी अशी ती आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं तिचं पुण्यात येणं होतं. तिथे तिची शास्त्रीबुवांशी भेट होते. शास्त्रीबुवांना भेटल्यानंतर तिच्या आयुष्यात छान वळण येते. फुलवंतीला परीसस्पर्श करणारे शास्त्रीबुवा आहेत. ती त्यांच्याशिवाय अपूर्ण आहे. अशी काहीशी ही फुलवंती आहे.” शास्त्रीबुवांची भूमिका गश्मीर साकारणार आहे.

“स्क्रिप्ट ऐकल्यानंतर पहिल्यांदा असं वाटलं…”

गश्मीरने त्याच्या चित्रपटातील भूमिकेविषयी बोलताना म्हटले, “व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री असे त्यांचे पूर्ण नाव आहे. पेशव्यांच्या दरबारातील वेदांत सूर्य व खूप मोठे पंडित म्हणून त्यांचा उल्लेख होतो. विद्वत्ता आणि कला यांतील द्वंद यावर आधारितच हा चित्रपट आहे. कलेची बाजू फुलवंती सांभाळते आणि विद्वत्तेच्या बाजूला व्यंकटशास्त्री आहेत.”

पुढे बोलताना तो म्हणतो, “भूमिकेविषयी जास्त काही सांगू शकत नाही. पण दोन गोष्टी प्रामुख्याने सांगाव्याशा वाटतात आणि त्या म्हणजे एक तर मला अशा रोलमध्ये बघणं, जी माझी अशी इच्छा होती की कोणीतरी करावं. व्यक्तिमत्त्व आणि आक्रमक अशा भूमिकांसाठी मला सतत बघितलं जातं, तशी कल्पना केली जाते. तर मला असं वाटायचं की, मराठी चित्रपटसृष्टीत असं कोणी नाहीये का की, ज्याला यापलीकडे बघता यावं. तर मी त्याची वाट बघत होतो. मी स्वत: विचार करून मग शेवटी काही लेखकांबरोबर स्क्रिप्ट लिहायला सुरुवात केली की, आता वेगवगळ्या भूमिका करण्याची वेळ आलीय माझी आणि तेवढ्यात यांनी मला विचारलं की, अरे तू ही भूमिका करशील का?”

गश्मीर म्हणतो, “या चित्रपटाची संपूर्ण स्क्रिप्ट ऐकल्यानंतर पहिल्यांदा असं झालं की, यात कुठेच काहीच चुकलं नाही. इथं चुकलंय वगैरे असं काहीच सांगावंसं वाटलं नाही. अक्षरश: ज्या पद्धतीच्या पात्राची मी वाट पाहत होतो, असं पात्र साकारायला मला आवडेल ती ही भूमिका आहे. या चित्रपटात एका वेगळ्या पद्धतीची, लोकांना आश्चर्यचकित करणारी भूमिका दिसेल.”

हेही वाचा: Video : कोकणातील संस्कृती, बाप्पाला गाऱ्हाणं अन्…; ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने दाखवली गावच्या विसर्जनाची झलक

प्राजक्ताने गश्मीरच्या भूमिकेविषयी बोलताना म्हटले, “हे पात्र गश्मीरशिवाय कोणीच साकारू शकलं नसतं. इतकं ते त्याच्यासाठी बनलेलं आहे. चित्रपट पाहिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला हे समजेल.”

दरम्यान, ‘फुलवंती’ हा चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्नेहल तरडे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून, प्राजक्ताने अभिनय करण्याबरोबरच चित्रपटाची निर्मितीदेखील केली आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांना भुरळ घालणार का हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

Story img Loader