Prajakta Mali : प्राजक्ता माळीने ‘फुलवंती’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटाला प्रेक्षकांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला. गेल्या काही दिवसांपासून ‘अशी मी मदन मंजिरी’ हे गाणं सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल होत आहे. प्राजक्ताच्या अभिनयाचं, नृत्याचं याशिवाय या चित्रपटाच्या भव्य-दिव्यतेचं दिग्गजांकडून कौतुक करण्यात आलं आहे. मात्र, हा ड्रीम प्रोजेक्ट पडद्यावर आणणं सोपं नव्हतं. यासाठी अभिनेत्रीने अथक मेहनत घेतल्याचं नुकत्याच ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

प्राजक्ता माळी सांगते, “मी फुलवंतीसाठी निर्माती म्हणून काम केलं. त्यामुळे मी या चित्रपटासाठी मानधन घेतलं नव्हतं. मी पैसा लावला नव्हता, त्यामुळे त्या दृष्टीने मी सेफ होते. मंगेश पवार, अमित जोशी आणि अर्थात पॅनोरोमा स्टुडिओजचे पैसे यासाठी लागले होते. पण, मला सर्वात महत्त्वाचं नाव होतं. जवळपास एकवर्ष हा प्रोजेक्ट पैशांअभावी थांबला होता, त्यामुळेच मी एवढी मरमर केली. किमान ५० लोकांच्या दारात जाऊन मी या प्रोजेक्टसाठी पैसे द्या अशी मागणी केली होती. हे खरंच खूप अवघड आहे. यासाठी मी पॅनोरोमाचे आभार मानते की, त्यांनी तेव्हा विश्वास ठेवून मला पैसे दिले.”

nana patole loksatta news
Nana Patole : “बीड, परभणीच्या घटना सरकार प्रायोजित”, नाना पटोलेंनी सांगितले घटनांमागील…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
man from nalasopara duped of rs 45 lakh on pretext of starting a gold company
दुबईत सोन्याची कंपनी सुरू करण्याची थाप; त्रिकुटाने घातला ४५ लाखांचा गंडा
Deadline Looms as India Struggles to Meet Soybean Procuremen
शेतकऱ्यांपुढे नवेच संकट, ‘हे’च संपले म्हणून खरेदी ठप्प. जबाबदार कोण ?
Microfinance institutions loan arrears rise to 4 3 percent print eco news
बचतगटांच्या परतफेडीत कसूर; मायक्रोफायनान्स संस्थांची कर्ज थकबाकी वाढून ४.३ टक्क्यांवर
Budget Out of 36 thousand crores, only 18 thousand crores were spent Mumbai news
अर्थसंकल्पाचा फुगवटा यंदाही कायम? ३६ हजार कोटींपैकी केवळ १८ हजार कोटीच खर्च
viraj bahl Success Story
Success Story: “याला म्हणतात जिद्द…” कंपनी विकली, घर विकलं.. अन् मेहनतीच्या जोरावर उभा केला करोडोंचा व्यवसाय
Torres Jewelry House scam investment a new pattern of fraud foreign company
टोरेस ज्वेलरी हाऊस घोटाळा… परदेशी कंपनीकडून फसवणुकीचा नवा पॅटर्न! सव्वा लाख गुंतवणूकदारांवर पस्तावण्याची वेळ का आली?

हेही वाचा : रेश्मा शिंदेचा नवरा आहे साऊथ इंडियन; सासरी गेल्यावर पहिला पदार्थ कोणता बनवला? म्हणाली, “सांबर राइस अन्…”

प्राजक्ता माळीने कराराबद्दल केला खुलासा

प्राजक्ता ( Prajakta Mali ) पुढे म्हणाली, “आता प्रोजेक्ट संपलाय, त्यामुळे सांगायला हरकत नाही. मी तेव्हा एक कॉन्ट्रॅक्ट साइन केलं होतं. त्यावर असं लिहिलं होतं की, प्राजक्ता माळींना आम्ही इतके करोड देतोय, हा चित्रपट जर बंद पडला किंवा ऑक्टोबर २०२४ च्या आधी जर हा चित्रपट पूर्ण झाला नाही तर, इतके कोटी रुपये प्राजक्ता माळी आम्हाला परत देतील तेही १८ टक्के व्याजासकट. हा असा मोठा करार मी तेव्हा केला होता. मदनमंजिरीवर नाचताना सुद्धा हे करोडो रुपयांचं ओझं डोक्यावर होतं. त्यामुळे हे अजिबातच सोपं नाहीये.”

हेही वाचा : Video : रितेश देशमुखने दोन्ही मुलांसह सजवला ख्रिसमस ट्री! जिनिलीयाने व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक

“माझी आई तेव्हा माझ्या पाठिशी खूप खंबीरपणे उभी राहिली. आई म्हणाली होती काळजी करू नकोस, तू करशील मी आहे तुझ्याबरोबर… आम्हाला माहितीये याला यश नाही आलं, तरी तू सगळं परत कमावशील. दुसऱ्या शेड्युलला दहाच्या दहा दिवस माझं कुटुंब सेटवर उपस्थित होतं, पॅनोरोमाची टीम सुद्धा होती. ती सही करतानाचा फोटो मी मध्यंतरी शेअर सुद्धा केला होता. त्या फोटोत आम्ही हसत होतो पण, आतमध्ये माझ्या मनात जे काही सुरू होतं ते फार वेगळं होतं. पण, या सगळ्यातून मी खूप काही शिकले. पहिल्याच प्रोजेक्टमधून असंख्य गोष्टी समजल्या.” असं प्राजक्ता माळीने ( Prajakta Mali ) सांगितलं.

दरम्यान, ‘फुलवंती’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर भरघोस यश मिळालं. यामध्ये प्राजक्ता माळीसह गश्मीर महाजनीने प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच स्नेहल तरडेंनी या चित्रपटाच दिग्दर्शन केलं आहे.

Story img Loader