झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका आज प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. यात प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे यांनी प्रमुख भूमिका साकारली. त्यांनी साकारलेल्या यश आणि नेहा या पात्रांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्याचप्रमाणे या मालिकेत ‘परी’ची भूमिका करणाऱ्या बालकलाकार मायरा वायकुळ ही सर्वांच्या चांगलीच लाडकी झाली. यश आणि नेहा आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार नसल्याने त्यांचे चाहते निराश झाले होते. पण आता ही जोडी नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं प्रार्थना आणि श्रेयस यांनी एक पोस्ट शेअर करत सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वीच या मालिकेचं चित्रीकरण पूर्ण झालं. तर आज या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होत आहे. यानिमित्त प्रार्थना आणि श्रेयस यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत या मालिकेचा त्यांचा प्रवास चाहत्यांची शेअर केला. तसंच एक खास कॅप्शन लिहित चाहत्यांना गुड न्यूजही दिली.

आणखी वाचा : Video: परीच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना बेहरेची खास पोस्ट, म्हणाली, “मला तू…”

प्रार्थना आणि श्रेयस यांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. यात मालिकेचा शेवटचा सीन शूट झाल्यानंतर सर्वांनी केलेला जल्लोष, या मालिकेच्या शूटिंग दरम्यानच्या काही व्हिडीओ क्लिप्स, काही बिहाईंड द सीन्स फोटो, मालिकेतील कलाकारांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी लिहिलं, “शो संपतोय…..आपलं नात नाही…आपली ही रेशीमगाठ अशीच कायम राहणार आहे…वर्षानुवर्ष…कारण आम्ही लवकरच काहीतरी नवीन घेवुन येऊ…फक्त तुमच्यासाठी…आणि म्हणूनच कोणीतरी म्हंटलय… *Picture* अभी बाकी है मेरे दोस्त…कुछ समझे?”

हेही वाचा : Video: ‘माझी तुझी रेशीमगाठ’च्या शेवटच्या भागाचं चित्रीकरण पूर्ण, पोस्ट शेअर करत प्रार्थना म्हणाली…

त्यामुळे आता मालिकेनंतर हीच लोकप्रिय जोडी आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे हे निश्चित झालं आहे. हा चित्रपट कोणता असेल, तो कधी प्रदर्शित होईल हे अद्याप गुलदस्तात ठेवण्यात आलं आहे. पण श्रेयस आणि प्रार्थनाला पुन्हा एकदा ऑनस्क्रीन एकत्र पाहायला मिळणार हे कळल्यावर चाहते खुश झाले आहेत. या व्हिडीओंवर कमेंट्स करत ते त्यांच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prarthana behere and shreyas talpade revealed that they are doing a film together rnv