Prarthana Behere : ‘पवित्रा रिश्ता’ या हिंदी मालिकेमुळे अभिनेत्री प्रार्थना बेहेरे घराघरांत लोकप्रिय झाली. मालिकाविश्वात ओळख निर्माण झाल्यावर अभिनेत्रीने आपला मोर्चा चित्रपटांकडे वळवला. सध्याच्या घडीला प्रार्थनाला मराठी कलाविश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना प्रार्थनाने २०१७ मध्ये अभिषेक जावकरशी लग्न केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिषेक जावकर हा प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता म्हणून ओळखला जातो. प्रार्थनाच्या जवळच्या मैत्रिणीच्या आईने अभिषेकचं स्थळ प्रार्थनाला सुचवलं होतं. ती देखील अरेंज मॅरेजसाठी तयार झाली आणि अभिषेकला भेटण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात; ‘या’ दिवशी वाजणार सनई-चौघडे

प्रार्थना ( Prarthana Behere ) आणि अभिषेकच्या लग्नाला आज बरोबर ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने लाडक्या नवऱ्याबरोबर रोमँटिक व्हिडीओ शेअर करत प्रार्थनाने त्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या दोघांच्या पहिल्या भेटीत नेमकं काय घडलं जाणून घेऊयात…

प्रार्थना बेहेरे व अभिषेकची पहिली भेट

प्रार्थना त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगताना म्हणाली होती, “आम्ही दोघांनी दुपारी लंचसाठी भेटायचं ठरवलं. आमची १ वाजताची वेळ ठरली होती. त्यामुळे मी आईला सांगितलं. आई १ वाजता जातेय…जास्तीत जास्त २ ते ३ वाजेपर्यंत गप्पा मारेन मग येते. त्यानंतर ४.३० वाजता मला आईचा फोन आला…अगं तू कुठेस? तेव्हा मी आईला म्हणाले, त्याच्याबरोबरच आहे अजून मी तुला फोन करते. त्यानंतर संध्याकाळचे ६ वाजेपर्यंत आम्ही गप्पा मारत होतो. पहिल्याच भेटीत आम्ही पाच तास ( दुपारी १ ते संध्याकाळी ६ ) गप्पा मारल्या.”

हेही वाचा : ‘प्रेमाची गोष्ट’मधून लोकप्रिय अभिनेत्याची एक्झिट! आता हर्षवर्धनच्या भूमिकेत झळकणार ‘हा’ कलाकार, मालिकेत आहे मोठा ट्विस्ट

अभिषेक पुढे म्हणाला, “गप्पा मारताना तिने खूप पॅनकेक्स खाल्ले होते. त्या पॅनकेकबरोबर तिने २ ते ४ किलो बटर खाल्लं होतं.” पहिल्याच भेटीत हे दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. यानंतर अभिषेकने प्रार्थनाला ( Prarthana Behere ) लग्नासाठी प्रपोज केलं होतं.

हेही वाचा : अक्षय कुमारच्या २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘या’ सिनेमाचा येणार सिक्वेल, चित्रपटाला २० वर्षे पूर्ण होताच निर्मात्यांनी केली घोषणा

अभिषेकने प्रार्थनाला ( Prarthana Behere ) लग्नासाठी विचारल्यावर हे दोघंही एकमेकांना डेट करू लागले. यानंतर १४ नोव्हेंबर २०१७ मध्ये या दोघांचा विवाहसोहळा गोव्यात पार पडला होता. प्रार्थना आणि अभिषेकच्या लग्नाला कुटुंबीय तसेच जवळचे मित्र-मैत्रिणी उपस्थित राहिले होते. आज या जोडप्याच्या लग्नाला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण कलाविश्वातून या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prarthana behere complete 7 year of marriage recalls her first meeting with husband abhishek jawkar sva 00