अभिनेत्री पूजा सावंत सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. १६ फेब्रुवारीला तिने सिद्धेश चव्हाण याच्याशी साखरपुडा केला. पारंपरिक पद्धतीने, थाटामाटात पूजा व सिद्धेशचा साखरपुडा पार पडला. यावेळी दोघं खूप सुंदर दिसते होते. दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने पूजाच्या साखरपुड्यातला व्हिडीओ शेअर केला आहे.
अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने आपल्या लाडक्या मैत्रिणीला नुकत्याचा शुभेच्छा दिल्या आहेत. साखरपुड्यातील धमाल-मस्तीचा व्हिडीओ शेअर करत प्रार्थनाने पूजा व सिद्धेशच्या नव्या आयुष्यासाठी खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये प्रार्थनासह तिचा नवरा, भूषण कडू, वैभव तत्ववादी, गश्मीर महाजनी, गौरी महाजनी, श्रेयस सावंत, रुचिरा सावंत, सौमिल शृंगारपुरे असे पूजाचे सगळे जवळेचे मित्र-मैत्रीणी दिसत आहेत. यामध्ये प्रार्थना सगळ्या कलाकारांसह विविध पोझ देताना पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – KGF स्टार यशच्या साधेपणाने जिंकली मनं; बायकोसाठी केली ‘ही’ गोष्ट, फोटो झाला व्हायरल
“पूजा आणि सिद्ध अभिनंदन” असं कॅप्शन देत प्रार्थनाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी पूजाला शुभेच्छा देत आहे, तर कोणी प्रार्थनाच्या लूकचं कौतुक करत आहे.
दरम्यान, आता पूजा कधी लग्न करणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिल आहे. मेहंदी, हळद, संगीत, सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्नसोहळा पूजाचा होणार आहे. संगीताची तयारी जोरदार सुरू असल्याची माहिती पूजाचा मित्र, अभिनेता वैभव तत्ववादीने तिच्या साखरपुड्याच्या दिवशी दिली.