छोट्या पडद्यावरील मालिका असो किंवा चित्रपट अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने तिच्या चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘मितवा’ चित्रपट, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही गाजलेली मालिका यामुळे गेल्या काही वर्षात प्रार्थनाच्या चाहत्यावर्गात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. तिने नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘गुलाबी साडी’ या गाण्याने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. लहान मुलांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण या गाण्यावर थिरकत असल्याचं पाहायला मिळत आहे. संजू राठोडच्या या गाण्याला सगळ्यांनीच पसंती दर्शवली आहे. प्रार्थना बेहेरेला सुद्धा या गाण्यावर थिरकण्याचा मोह आवरला नाही. अभिनेत्रीने खास साडी नेसून या गाण्यावर व्हिडीओ शूट केला आहे.

हेही वाचा : स्वप्नपूर्ती! रुचिरा जाधवने घेतलं नवीन घर, दारावरच्या पाटीवर लावलं आई-बाबांचं नाव, फोटो शेअर करत म्हणाली…

‘गुलाबी साडी’ या गाण्यावर डान्स करण्यासाठी प्रार्थनाने खास इंडो-वेस्टर्न लूक केला होता. गुलाबी रंगाची साडी, त्यावर पिवळ्या रंगाचा ब्लाऊज, गळ्यात सुंदर असा नेकलेस असा लूक अभिनेत्रीने केला होता. अभिनेत्रीने या व्हिडीओला “माय गुलाबी लव्ह” असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा : ‘हे मन बावरे’ फेम शशांक केतर व मृणाल दुसानिस पुन्हा झळकणार एकत्र? अभिनेत्याच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

दरम्यान, प्रार्थना बेहेरेने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अवघ्या काही तासांतच अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओवर साडेचार लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prarthana behere dances on viral song gulabi sadi shares video watch now sva 00