अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने २००९ मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘पवित्र रिश्ता’ या छोट्या पडद्यावरील मालिकेमुळे अभिनेत्री घराघरांत लोकप्रिय झाली. हिंदी मालिकेतील पदार्पणानंतर हळुहळू प्रार्थनाने अनेक मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘मितवा’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ हे तिचे चित्रपट प्रचंड गाजले. यादरम्यान प्रार्थनाशी इंडस्ट्रीतील बऱ्याच कलाकारांशी घट्ट मैत्री झाली. आज तिच्या याच लाडक्या मित्र-मैत्रिणींनी तिला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रार्थना बेहेरेची भूषण प्रधान, सोनाली कुलकर्णी, स्वप्नील जोशी, पुष्कर जोग, पूजा सावंत या कलाकारांशी गेली अनेक वर्षे घट्ट मैत्री आहे. अभिनेत्रीला इंडस्ट्रीतील हे तिचे सगळे मित्र-मैत्रिणी प्रेमाने एका अनोख्या नावाने हाक मारतात.

हेही वाचा : ‘३६ गुणी जोडी’ पाठोपाठ ‘झी मराठी’ची आणखी एक लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? अभिनेत्रीच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

सोनाली कुलकर्णी व पूजा सावंत या दोघींनी प्रार्थनाला खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोनाली-पूजाने त्यांच्या पोस्टमध्ये प्रार्थनाच्या टोपणनावाचा खुलासा केला आहे. इतर काही कलाकारांनी सुद्धा प्रार्थनाचं टोपणनाव पोस्टमध्ये लिहित तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रार्थनाचं टोपणनाव काय असेल याचा प्रश्न तिच्या अनेक चाहत्यांना कायम पडलेला असतो. अखेर आज तिच्या वाढदिवसानिमित्त सगळ्या तिच्या मित्र-मैत्रिणींनी पोस्टमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा Tumpa असं अभिनेत्रीला म्हटलं आहे. यावरून प्रार्थनाचं टोपणनाव Tumpa आहे हे स्पष्ट झालेलं आहे.

सोनाली कुलकर्णी

हेही वाचा : ‘दादा एक गुड न्यूज आहे’ फेम अभिनेता अडकणार विवाहबंधनात, मेहंदी सोहळ्यातील फोटोंवर ऋता दुर्गुळेची खास कमेंट

दरम्यान, अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं, तर २०१७ मध्ये प्रार्थनाने अभिषेक जावकरशी लग्न केलं. आता दोघेही मुंबई सोडून अलिबागला सुखी संसार करत आहेत. २०१८ मध्ये लग्न झाल्यावर काही काळ इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता. त्यानंतर २०२२ मध्ये ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून अभिनेत्रीने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं होतं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prarthana behere nickname is tumpa revealed by sonalee kulkarni and pooja sawant sva 00