मनोरंजन क्षेत्रातील कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने श्रेयस तळपदेच्या यूट्यूब चॅनेलला नुकतीच मुलाखत दिली. त्यावेळी प्रार्थनाने केलेले वक्तव्य चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाली प्रार्थना?

अभिनेता श्रेयस तळपदेच्या यूट्यूब चॅनेलवर ‘श्रेयस तळपदेसोबत दिलखुलास गप्पा’ या सेग्मेंटमध्ये प्रार्थना बेहेरेने नुकतीच हजेरी लावली होती. त्यावेळी श्रेयसने तिला विचारले, “तुला काय व्हायचं होतं? पहिल्यापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं का” या प्रश्नाचे उत्तर देताना तिने म्हटले, “मला फेमस व्हायचं होतं. मी लहान होते तेव्हा वर्तमानपत्रात एका बाजूला जे वारले आहेत त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी फोटो दिलेला असायचा. तर मी बाबांना विचारायचे की, ज्यांचे वर्तमानपत्रात फोटो येतात, ते किती प्रसिद्ध असतील आणि तो मेल्यानंतर त्याचा फोटो येतोय, तर ही किती मोठी गोष्ट आहे. लहान असताना मी काय विचार करायचे माहितेय? जिवंत असताना मी किती काम करीन माहीत नाही; पण मेल्यानंतर मला सगळ्यांनी ओळखलं पाहिजे. सगळ्यांना माहीत व्हायला हवे की मी कोण आहे.”

याबद्दल अधिक बोलताना प्रार्थना म्हणते, “मला आठवतं की, बाबा मला म्हणाले की, काय वेड्यासारखं बोलतेय. असं काही असतं का, हे असं बोलायचं नसतं. पण, अजूनही मला असं वाटतं की, मला नाही माहीत की, मी जिवंत असताना कोण मला लक्षात ठेवेल की नाही. पण, मेल्यानंतर लोकांना मी माहीत असायला हवी. लोकांच्या आयुष्यावर मी काहीतरी प्रभाव ठेवून गेली पाहिजे की, मेल्यानंतरदेखील त्यांना मी आठवेन.”

हेही वाचा: Video : टास्क हरल्यानंतर निक्कीने सूरजला समजावलं, म्हणाली, “तू वाईट….”, व्हिडीओ पाहताच नेटकरी म्हणाले, “ती घाबरली….”

याबरोबरच प्रार्थनाने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल श्रेयस तळपदेबरोबर गप्पा मारताना खुलासा केला आहे. तिने बहिणीच्या लग्नाविषयी बोलताना म्हटले, “माझ्या बहिणीचं लव्ह मॅरेज आहे; पण बाबांचा त्याला विरोध होता. त्यांना असं वाटायचं की, मराठी मुलाशी लग्न झालं पाहिजे; पण ताईला त्याच मुलाशी लग्न करायचं होतं. मला तिचा त्रास बघून कधी कधी वाटायचं की, तिनं पळून जाऊन लग्न करावं. पण, ताई तिच्या निर्णयावर ठाम राहिली. जोपर्यंत वडिलांनी त्यांच्या लग्नाला परवानगी दिली नाही, तोपर्यंत त्यांनी लग्न केलं नाही. त्या दोघांनी १२ वर्षं एकमेकांना डेटही केलं आहे. आज तिच्या त्या निर्णयाकडे बघताना वाटतं की, ताईचं बरोबर होतं.”

दरम्यान, श्रेयस तळपदे आणि प्रार्थना ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत एकत्र दिसले होते. त्यांच्या या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले होते.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prarthana behere opens about her life perspective at shreyas talpade youtube channel nsp