मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये अभिनेत्री प्रार्थना बेहरेचं नाव आवर्जुन घेतलं जातं. काही दिवसांपूर्वीच तिच्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेमधील प्रार्थनाच्या भूमिकेने प्रेक्षकांना अगदी वेड लावलं. सध्या प्रार्थनाने तिच्या कामामधून ब्रेक घेतला असल्याचं दिसत आहे. दरम्यान तिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. यामुळे प्रार्थनाला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
आणखी वाचा – Video : “आयुष्यात कधीच कुटुंबियांच्या…” सिद्धार्थ जाधवचं लग्नाबाबत भाष्य, अभिनेत्याचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
प्रार्थनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे तिचा एक बोल्ड व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने पांढरे कपडे परिधान केले असल्याचं दिसत आहे. तसेच तिने बेडवर हा व्हिडीओ शूट केला आहे. मात्र प्रार्थनाचा हा बोल्ड लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला नसल्याचं चित्र पाहायला मिळालं.
प्रार्थनाने केस मोकळे सोडले आहेत. तर व्हिडीओमधील तिचे हावभाव विशेष लक्ष वेधून घेणारे आहेत. यावरुन नेटकऱ्यांनी तिला चांगलंच सुनावलं आहे. हे सगळं करण्याची काहीही गरज नाही. तुम्ही सगळं प्रसिद्धीसाठी करता, काहीही केलं तरी तुला चित्रपटात काम मिळणार नाही, प्रसिद्धी मिळवण्यासाठी व चांगलं दिसण्यासाठी प्रत्येकजण स्वतःकडे लक्ष देत आहे. अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
आणखी वाचा – “घाणेरडं कंबरे खालचं लिहायचं आणि…” कोणावर भडकले शरद पोंक्षे? शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत
तर काहींनी प्रार्थनाच्या या नव्या लूकचं कौतुकही केलं आहे. प्रार्थनाने याआधीही बोल्ड लूकमधील काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले होते. त्यावेळीही काहींनी तिच्या लूकचं कौतुक केलं तर काहीनी तिला ट्रोल केलं होतं.