मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीता प्रार्थना बेहरेचं नाव सामील आहे. मालिका असो अथवा चित्रपट; तिने तिच्या कामाने सर्व प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. काही दिवसांपूर्वी पर्यंत ती ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. पण आता ती काय करते हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक होते. याची माहिती स्वतः प्रार्थना आणि एक पोस्ट शेअर करत दिली.

प्रार्थना नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांची शेअर करत असते. आता तिने तिचा एक खास व्हिडीओ पोस्ट केला आणि तब्बल पंधरा वर्षांनंतर तिच्या आयुष्यात एक खास क्षण आला असल्याचं तिने चाहत्यांना सांगितलं.

myra vaikul emotional
Video : ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगला मायरा वायकुळ झाली भावुक; रडतानाचा व्हिडीओ व्हायरल
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
video of true two school friend met after 5 years
VIDEO : तब्बल पाच वर्षानंतर जिवलग मैत्रीणी भेटल्या अन् मिठी मारून ओक्साबोक्शी रडल्या; व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावुक
Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
viral video elederly man playing on a jumping jack video goes viral on social media
“आयुष्य एकदाच मिळते मनसोक्त जगा” जपिंग-जपांगमध्ये आजोबांनी लहान मुलांसारखा घेतला आनंद; प्रत्येकानं पाहावा असा VIDEO
Shocking video The Viral Girl Monalisa Breaks Youtubers Camera Mahakumbh 2025
“प्रसिद्धीची हवा एवढ्या लवकर डोक्यात घुसली?” महाकुंभमेळ्यातील सुंदर मुलीनं युट्यूबरसोबत काय केलं पाहा; VIDEO झाला व्हायरल
Shocking video jija sali kiss video went viral on internet users reacted watch viral kiss video
साली आधी घरवाली! वऱ्हाड्यांसमोर मेहुणीनं नवरदेवाला किस केलं अन् पुढच्याच क्षणी…; Video पाहून लावाल डोक्याला हात

आणखी वाचा : रेशीमगाठ कायम राहणार! मालिका संपताना प्रार्थना बेहरे-श्रेयस तळपदेने चाहत्यांना दिली गुड न्यूज, म्हणाले, “आम्ही लवकरच…”

प्रार्थना बेहरे एक उत्कृष्ट अभिनेत्री असण्याबरोबरच एक उत्तम नृत्यांगनाही आहे. लहानपणी भरतनाट्यम या नृत्य प्रकाराचे तिने धडे गिरवले आहेत. तर आता तब्बल १५ वर्षांनी तिला भरतनाट्यमचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली. तिने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ती भरतनाट्यम सादरीकरण करण्यापूर्वीची तयारी करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ती भरतनाट्यमच्या सादरीकरणाचा सराव करताना, वेशभूषा आणि अलंकार परिधान करतानाही दिसत आहे. तिचा हा पारंपारिक लूक पाहून तिचे चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत.

हेही वाचा : “दर महिन्याला एक छोटीशी ट्रिप,” स्पृहा जोशीच्या हटके संकल्पाची चर्चा, नेटकरी म्हणाले, “पैसा असल्यावर…”

प्रार्थनाच्या या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या. तर त्याच बरोबर या नृत्य प्रकाराचं ती सादरीकरण करत असल्याने तिचं अभिनंदनही केलं. आता या व्हिडीओमध्ये प्रार्थनाची एक वेगळी बाजू नव्याने तिच्या चाहत्यांसमोर उलगडली गेली आहे.

Story img Loader