Marathi Actress Prarthana Behere : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहेरेला ओळखलं जातं. आजवर तिने अनेक मालिका तसेच चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आपल्या गोड स्वभावामुळे प्रार्थना नेहमीच सर्वांचं मन जिंकून घेते. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, अभिनेत्रीने नुकतीच एक भावनिक पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे. प्रार्थनाच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. तिने भावुक पोस्ट लिहित भावाच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
“लव्ह यू पिंटू… तुझी कायम आठवण येत राहील. तू असा अचानक निघून गेलास. पण, भाऊ असे कधीही वेगळे होत नाहीत. आठवणी कायम मनात जिवंत राहतात. Rest in peace … आपण पुढच्या जन्मात एकमेकांना भेटू.” अशी पोस्ट शेअर करत प्रार्थनाने ( Prarthana Behere ) भावाच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे.
दरम्यान, प्रार्थना बेहेरेच्या ( Prarthana Behere ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत अभिनेत्रीने मध्यवर्ती भूमिका साकारली होती. तसेच २०२४ मध्ये शेवटची ती ‘बाई गं’ चित्रपटात झळकली. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्रीने ‘मितवा’नंतर पुन्हा एकदा स्वप्नील जोशीबरोबर स्क्रिन शेअर केली होती.