प्रार्थना बेहेरे ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे ती घराघरांत पोहोचली. ‘मितवा’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’, ‘कॉफी आणि बरंच काही’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये प्रार्थनाने काम केलं आहे. अभिनयाबरोबरच ती सोशल मीडियावरदेखील सक्रिय असते. अलीकडेच तिने स्वत:चं युट्यूब चॅनेल सुरू केलं होतं. आता प्रार्थनाने एक नवीन इनिंग सुरू केली आहे.

हेही वाचा : Video : अक्षराला घेऊन अधिपती चढणार जेजुरीचा गड, सुरू होणार मास्तरीण बाईंचा संसार, पाहा नवा प्रोमो

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
d y chandrachud
D. Y. Chandrachud : प्रार्थनास्थळांबाबतच्या निर्णयावर माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी…”
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
Tuberculosis awareness campaign for 100 days in Nashik district
नाशिक : जिल्ह्यात शंभर दिवसांसाठी क्षयरोग जागृती मोहीम
rekha lata mangeshkar
“देवा पुढल्या जन्मी…”, रेखा यांनी सांगितला लता मंगेशकरांबद्दलचा ‘तो’ किस्सा; म्हणाल्या, “मला त्यांनी…”
stock market sensex and nifty
खिशात नाही आणा…
Cousin kills brother over love affair in Pimpri Chinchwad
पुणे: चुलत भावाचे बहिणीसोबत प्रेमप्रकरण; भावाने कोयत्याने वार करून केली हत्या

अभिनयाबरोबरच प्रार्थनाने आता स्वत:चा नवीन व्यवसाय सुरू केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली. घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी प्रार्थनाने नव्या व्यवसायाची घोषणा करत तिच्या नव्या ब्रॅन्डविषयी प्रेक्षकांना माहिती दिली आहे.

हेही वाचा : “…आणि तो अद्भुत प्रवास संपला” शंकर महाराजांची भूमिका साकारलेल्या संग्राम समेळची भावुक पोस्ट, म्हणाला…

प्रार्थनाने तिची नणंद पल्लवी भिडेच्या साथीने साड्यांचा नवा ब्रॅन्ड सुरू केला आहे. ‘वी नारी’ (WeNaari) असं त्यांच्या नवीन ब्रॅन्डचं नाव आहे. इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून प्रार्थनाने ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना दिली. “अनेक दिवसांपासून नवा ब्रॅन्ड सुरू करण्याची इच्छा होती अखेर आज घटस्थापनेच्या दिवशी आम्ही ‘वी नारी’ या आमच्या ब्रॅन्डची सेवा सुरू करत आहोत. मी आणि माझ्या नणंदेने मिळून हा ब्रॅन्ड सुरू केला आहे.” असं प्रार्थना इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये सांगितलं.

हेही वाचा : Video : हास्यजत्रेच्या नायिका बॉलीवूडच्या प्रसिद्ध कोरिओग्राफरसह थिरकल्या, ‘या’ व्हायरल गाण्यावर केला जबरदस्त डान्स

प्रार्थनाने त्यांच्या पहिल्या साडीची झलकदेखील आज इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. तसेच नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने रोज नऊ रंगाच्या साड्या तुम्हाला मिळतील असंही अभिनेत्रीने सांगितलं. दरम्यान, प्रार्थना बेहेर २०१८ मध्ये लग्न झाल्यावर काही काळ इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता. त्यानंतर गेल्यावर्षी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून अभिनेत्रीने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

Story img Loader