राठी विश्वातील सुंदर, गोड आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहेरेला ओळखले जाते. अनेक मालिका आणि चित्रपटांमुळे ती घराघरात पोहोचली. काही दिवसांपूर्वी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत दिसली होती. प्रार्थना बेहेरे ही कायमच तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते.
हेही वाचा- अक्षयाला मोदक करता येतात का? हार्दिक जोशीने दिलेल्या उत्तराने वेधलं लक्ष, म्हणाला…
१४ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रार्थनाने अभिषेक जावकरबरोबर लग्नागाठ बांधली. परंतु लग्नानंतर प्रार्थना चित्रपटात दिसेनाशी झाली. नुकत्याच एका मुलाखतीत प्रार्थनाने लग्नानंतर चित्रपटात न दिसण्यामागच्या कारणाचा खुलासा केला आहे.
हेही वाचा-“अपूर्वा, तेजश्री राजपेक्षा मोठ्या दिसतात…”, ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली…
प्रार्थना म्हणाली. “लग्नापूर्वी मी एका वर्षात पाच चित्रपट करत होते. २०१७ मध्ये माझं लग्न ठरलं. त्यानंतर मला माझ्या नवऱ्याबरोबर वेळ घालवायचा होता. माझ्या संसाराचा आनंद घ्यायचा होता. मला ब्रेक हवा होता. त्यामुळे मी चित्रपट आणि प्रोजेक्टच्या ऑफर नाकारल्या. पण मला एवढा मोठा स्पेस मिळेल असं वाटलं नव्हत की लोकं विसरतील प्रार्थना बेहरे नावाची अभिनेत्री होती.”
प्रार्थना पुढे म्हणाली, कदाचित त्यामागे एक कारण होतं ते म्हणजे, मी खूपच जाड झाले. त्यामुळे लोकांना वाटू लागलं हिने लग्न केल्यामुळे काम बंद केलं. जाड झाली आहे प्रेग्नंट असेल म्हणजे एकंदरीत मुलींबद्दल जे विचार केले जातात. २०१९ मध्ये मी माझ्या नवऱ्याची एक वेबसिरीज केली. २०२० मध्ये कोविड आला. कोविडमध्ये दोन वर्ष मला काम मिळालं नाही. तीन वर्ष मी कोणत्याच माध्यमावर दिसले नव्हते. आणि चाहते माझ्या अगामी प्रोजक्टची सारखी विचारणा करत होते. त्यानंतर मला जाणवलं की आता मला स्क्रिनवर यायाल पाहिजे.”
हेही वाचा- “गढुळ केलेल्या कलाक्षेत्रात…”; किरण मानेंची बॉलीवूड किंग शाहरुख खानसाठी खास पोस्ट
अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे. अर्थशास्त्रात पदवीधर असलेल्या अभिषेकला परदेशात जाऊन एमबीए करण्याची इच्छा होती. पण, कॉलेजच्या दिवसांमध्ये इव्हेंट मॅनेजमेन्टसाठी काम करणाऱ्या अभिषेकला त्याच्या मित्राने चित्रपट निर्मिती क्षेत्रात गुंतवले. मूळ ‘सिंघम’ चित्रपटाची निर्मितीही अभिषेकनेच केली आहे. ‘यमुदू’, ‘गोलिमार’ आणि तेलगूमध्ये डब केलेल्या ‘हॅरी पॉटर’ सीरिजचे वितरणही अभिषेकनेच केले.
दरम्यान प्रार्थना ही एका चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच तिने झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमध्ये नेहा कामत ही भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. या मालिकेतील तिच्या भूमिकेला आणि मालिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.