Chiki Chiki Booboom Boom New Marathi Movie : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता प्रसाद खांडेकरने ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. आता नव्या वर्षात त्याचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वर्षाखेरीस याची पहिली झलक प्रसादने ( Prasad Khandekar ) नुकतीच इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

प्रसाद खांडेकरच्या नव्या चित्रपटात सुद्धा दिग्गज मराठी कलाकारांची फौज असणार आहे. या चित्रपटाचा पहिला लूक नुकताच समोर आलेला आहे. या नव्या सिनेमाचं नाव ‘चिकी चिकी बुबूम बूम’ असं आहे. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरवर प्रसाद खांडेकरसह स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, वनिता खरात, प्राजक्ता माळी असे लोकप्रिय कलाकार झळकले आहेत. त्यामुळे आता आपल्याला खळखळून हसवणाऱ्या विनोदवीरांना प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर एकाच फ्रेममध्ये पाहण्याची संधी मिळणार आहे.

sonali kulkarni bought new new mercedes benz car
सोनाली कुलकर्णीने खरेदी केली मर्सिडीज-बेंझ! अभिनेत्रीचं नव्या गाडीसह खास फोटोशूट, कारची किंमत किती?
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Marathi actor abhijeet kelkar reaction on trolling about suraj Chavan his post
“मी ब्राम्हण जातीतला असलो तरी…”, सूरज चव्हाणबद्दल केलेल्या पोस्टवरील ट्रोलिंगवर अभिजीत केळकरचं भाष्य, म्हणाला, “मला शिव्या देऊन..
Alka Kubal
“त्या रोज पॅक अप झालं की…”, अलका कुबल यांनी सांगितली स्मिता पाटील यांची आठवण; म्हणाल्या…
Phullwanti on OTT
घरबसल्या पाहा प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
vanita kharat and veena jamkar shares first time screen together
सिनेमात वनिता खरातची शेजारी झाली ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री! पहिल्यांदाच दोघी एकत्र स्क्रिन शेअर करणार, म्हणाल्या…

हेही वाचा : मिथुन चक्रवर्तींबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर अस्वस्थ होत्या श्रीदेवी; सुजाता मेहता आठवण सांगत म्हणाल्या, “ती एका कोपऱ्यात…”

एकाच चित्रपटात झळकणार हास्यजत्रेचे लोकप्रिय कलाकार

‘चिकी चिकी बुबूम बूम’ हा चित्रपट येत्या २८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. प्रसाद खांडेकरांच्या या नव्या चित्रपटात त्याच्यासह स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी, नम्रता संभेराव, वनिता खरात, रोहित माने, ओंकार राऊत, निखिल रत्नपारखी, प्रियदर्शनी इंदलकर, सचिन गोस्वामी, चेतना भट, प्रभाकर मोरे, ऐश्वर्या बदाडे, श्याम राजपूत, निखिल बने, प्रमोद बनसोडे, श्लोक खांडेकर, अभिजीत चव्हाण आणि अपर्णा क्षेमकल्याणी हे कलाकार झळकणार आहेत.

हेही वाचा : “काय ते थर्ड क्लास…”, गश्मीर महाजनीचं Bigg Boss 18 बद्दल प्रश्न विचारणाऱ्याला उत्तर; म्हणाला, “अहो तुम्ही मराठी सिनेमा…”

‘चिकी चिकी बुबूम बूम’ चित्रपटाचा पहिला लूक शेअर करत अभिनेता लिहितो, “तुमच्या ३१ डिसेंबरच्या पार्टीत ‘चिकी चिकी बुबूम बूम’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगतोय. तारीख लक्षात ठेवा. २८ फेब्रुवारी २०२५ पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात ‘चिकी चिकी बुबूम बूम’ बघा आणि मग हसायचं थांबवणं तुमच्या हातात नाही!” या चित्रपटाची हास्यजत्रेचे चाहते देखील आतुरतेने वाट पाहत आहेत.

‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचे निर्माते सुनील नारकर असून सहनिर्माते सेजल दिपक पेंटर आणि प्रसाद महादेव खांडेकर आहेत. चित्रपटाचं लेखन प्रथमेश शिवलकर आणि प्रसाद खांडेकर ( Prasad Khandekar ) यांचं आहे. याशिवाय या चित्रपटाला रोहन रोहन यांचं संगीत लाभलं आहे.

Story img Loader