महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता प्रसाद खांडेकरचा ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती. याचित्रपटात तब्बल १६ विनोदवीरांनी भूमिका साकारली आहे. आता लवकरच या चित्रपटाचा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्रसिद्ध चित्रपट निर्माते राजेश मोहंती या चित्रपटाच्या हिंदी रिमेकची निर्मिती करणार आहेत. काही दिवासंपूर्वीच त्यांनी एका मुलाखतीत याबाबतची घोषणा केली. ते म्हणाले, “आम्ही लवकरच या चित्रपटाचा हिंदी रिमेक करणार आहोत. या चित्रपटाची संकल्पना फारच चांगली आहे. ही कथा भारतीय प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची आम्हाला खात्री आहे.”
तसेच त्यांनी या चित्रपटाच्या स्टारकास्टबाबतही मोठा खुलासा केला आहे. एकदा येऊन तर बघाच्या हिंदी रिमेसाठी बॉलीवूडमधील मोठ्या कलाकारांशी संपर्क साधण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्यांच्याकडून होकार आलेला नाही. त्यामुळे या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये बॉलीवूडचे कोणकोणते कलाकार झळकणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
हेही वाचा- साधं अन् सुंदर आहे प्रथमेश परबच्या बायकोचे मंगळसूत्र, ‘त्या’ खास डिझाइनने वेधलं लक्ष, पाहा फोटो
‘एकदा येऊन तर बघा’मध्ये सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, भाऊ कदम, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार, पॅडी कांबळे, राजेंद्र शिसटकर, वनिता खरात, रोहित माने, शशिकांत केरकर, सुशील इनामदार, जय चौबे, राकेश शालिन यांच्या प्रमुख भूमिका होत्या.