प्रसाद खांडेकर दिग्दर्शित एकदा येऊन तर बघा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. एकदा येऊन तर बघा या चित्रपटाला चित्रपटगृह मिळण्यात अडचणी येत असल्याचे खंत प्रसाद खांडेकरांनी व्यक्त केली होती. नुकतंच विधान परिषदेचे सभागृह नेते प्रवीण दरेकर यांनी हा मुद्दा विधान परिषदेत मांडला. त्यावर आता प्रसाद खांडेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रसाद खांडेकरांनी नुकतंच विधान परिषदेतील एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत अनेक मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळण्यात अडचणी येत असल्याचा मुद्दा मांडला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. यावर त्यांनी एक पोस्टही शेअर केली आहे.
आणखी वाचा : पियुष रानडेबरोबर लग्नगाठ बांधल्यानंतर सुरुची अडारकरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
chala hawa yeu dya reality show got less trp from last few years
‘चला हवा येऊ द्या’कडे प्रेक्षकांनी का पाठ फिरवली, TRP कमी का झाला? भाऊ कदम म्हणाले, “दुसऱ्या चॅनेलवरच्या कॉमेडी शोमध्ये…”
Tejashri Pradhan
तेजश्री प्रधानचा सिच्युएशनशिप, बेंचिंगबाबत तरुण पिढीला सल्ला; म्हणाली, “ज्या क्षणाला तुम्ही तुमचा आत्मसन्मान…”

प्रसाद खांडेकरांची पोस्ट

“स्ट्रगल इथले संपत नाही……
“एकदा येऊन तर बघा”
सिनेमा ८ डिसेंबर पासून सर्वत्र प्रदर्शित होतोय, झालं असं की
आत्तापर्यंत बऱ्याचदा अस झालंय की मराठी सिनेमांना थिएटर्स मिळताना खुप मारामार करावी लागते …ज्या सिनेमाच्या पाठीशी मोठे बॅनर आणि मोठे प्रोडक्शन हाऊस असतात त्यांच्या नशिबात आरामात थिएटर्स मिळतात ….

पण हा आत्तापर्यंत चा अनुभव फक्त वाचून आणि ऐकून होतो पहिल्यांदा हा अनुभव आत्ता मला माझ्या पहिल्याच सिनेमाच्या बाबतीत सुद्धा आला. मुळात सगळेच मराठी सिनेमे थिएटर मध्ये चालावेत म्हणून आधीच मी इतर दोन मराठी सिनेमांची रिलीज डेट अनाऊन्स झाल्यामुळे मी माझ्या सिनेमाची रिलीज डेट दोनदा पुढे ढकलून दीड महिने आधीच मी 24 नोव्हेंबर ही तारीख अनाऊन्स केली की जेणेकरुन त्यावेळी जर कोणी रिलीज करणार असतील तर मराठी सिनेमांची आपापसात स्पर्धा नको व्हायला…..

तरीही एका मोठ्या मराठी सिनेमाची त्या दिवशी रिलीज डेट अनाऊन्स झाली …. आता ह्या सिनेमातील ही सगळेच मित्र मैत्रिणी असल्या कारणाने आणि पुन्हा एकाच दिवशी रिलीज करून पुन्हा स्पर्धा नको म्हणून डिस्ट्रिब्युटर सोबत चर्चा करून पूर्ण पब्लिसिटी झालेली असताना सुद्धा सिनेमा अजून दोन आठवडे पुढे ढकलला आणि 8 डिसेंम्बर ला रिलीज करण्याच ठरवलं ….

8 डिसेंम्बर ला थिएटर्स आणि स्क्रिनस नक्की मिळतील अस आश्वासन मिळालं परंतु आता शुक्रवारी फिल्म रिलीज असताना बुधवार रात्र आली तरी सिनेमाला थिएटर आणि स्क्रिनस मिळत नव्हते ..बरं जे मिळाले ते हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आणि छोटे स्क्रिन त्यातही सकाळ आणि दुपारचे शोज मिळत होते ……सोशल मीडिया वरून प्रेक्षक थेट विचारत होते की सिनेमा आमच्या भागातल्या थिएटर्स ना दिसत नाहीये.

मी बोरिवली मध्ये राहायला ….माझ्या स्वतःच्या घरच्यांना सिनेमा पाहायचा आहे पण जवळच्या थिएटर मध्ये शोच नाही .आणि मग हे घडलं..कलाकार असल्यामुळे सगळ्याच पक्षाच्या सगळ्याच लोकांसोबत खुप छान संबंध आहेत …. आज सकाळी मा.प्रविण भाऊ दरेकर ह्यांच्यासोबत बोलताना मी त्यांना झालेला प्रकार सांगितला आणि त्यांनी तो तात्काळ अधिवेशनात मांडला आणि चक्र फिरली….

प्रवीण भाऊ दरेकर ह्यांचे खरंच मनापासून आभार ….मा. मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे , मा उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस , मा. सुधीर मुनगंटीवार साहेब ह्यांचे सुद्धा मनःपूर्वक आभार …आणि माझा वर्गमित्र सागर बागुल तुला ही थँक्स मित्रा …हे फक्त माझ्याच सिनेमाच्या बाबतीतील म्हणणं नाहीये तर सगळ्याच मराठी सिनेमांना योग्य न्याय मिळाला पाहिजे”, असे प्रसाद खांडेकर यांनी म्हटले.

दरम्यान ‘एकदा येऊन तर बघा’ हा एक विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटात तब्बल १६ दिग्गज कलाकार झळकताना दिसत आहेत. ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात फुलंब्रीकर कुटुंब आणि त्यांचा हॉटेल व्यवसाय यावर आधारित कथानक पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा : सुरुची अडारकर आणि पियुष रानडेच्या लग्नाच्या रिसेप्शनचे फोटो समोर, पोस्ट शेअर करत म्हणाली…

या चित्रपटात सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, भाऊ कदम, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार, पॅडी कांबळे, राजेंद्र शिसटकर, वनिता खरात, रोहित माने, शशिकांत केरकर, सुशील इनामदार, जय चौबे, राकेश शालिन हे कलाकार सहभागी होणार आहेत.

Story img Loader