अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक ‘हिरकणी’ आणि ‘चंद्रमुखी’चित्रपटाच्या यशानंतर पुन्हा एकदा दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने ‘वडापाव : एका गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी’ या चित्रपटाची घोषणा केली होती. यानंतर या चित्रपटाचे शूटिंग लंडन येथे सुरु झाले होते. आज जागतिक वडापाव दिवसाच्या निमित्ताने प्रसाद ओकने चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे लवकरच झळकणार हिंदी चित्रपटात, शेअर केलेली पोस्ट चर्चेत

प्रसाद ओक वडापाव दिनाच्या शुभेच्छा देत लिहितो, “आज २३ ऑगस्ट जागतिक वडा पाव दिवस. हा दिवस दरवर्षी २३ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. अनेक मुंबईकरांसाठी नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण हे सगळं म्हणजे फक्त वडापाव. मुंबईत येऊन कोणी वडापाव खाल्ला नाही, अशी शक्यता क्वचितच !! अशाच एका रूचकर वडापावची गोष्ट आणि सोबत एका गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी…आम्हीही घेऊन येतोय लवकरच…!!!”

हेही वाचा : “माझ्या नावासह सापाचा इमोजी…”, करण जोहरने ट्रोलर्सला सुनावलं; म्हणाला, “विचित्र कमेंट्स…”

प्रसाद ओकने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ‘वडापाव’ चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाचे लंडनमध्ये शूटिंग सुरु झाल्यावर प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओकने सर्वांसाठी खास पोह्यांचा बेत केला होता. याचा व्हिडीओ हास्यजत्रा फेम शिवाली परबने शेअर केला होता.

हेही वाचा : “शिवराय प्रेमींसाठी आऊसाहेब असणारी व्यक्ती…”, मृणाल कुलकर्णींसाठी सूनबाईंची खास पोस्ट; म्हणाली, “एकत्र काम करून…”

दरम्यान, वडापाव चित्रपटात प्रसाद ओकसह गौरी नलावडे, लक्ष्मीकांतचा बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे, रितिका श्रोत्री, हास्यजत्रा फेम रसिका वेंगुर्लेकर, सिद्धार्थ साळवी, शाल्व किंजवडेकर, सविता प्रभुणे हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच कुणाल करण यांनी चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी सांभाळली आहे.