महाराष्ट्रातील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीतील एक अभिनेता म्हणजे प्रसाद ओक. गेली अनेक वर्षं तो त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. नाटक असो, मालिका असो किंवा चित्रपट असो; त्याच्या प्रत्येक भूमिकेचं प्रेक्षकांनी कौतुक केलं. त्याच्या इतक्या वर्षांच्या कारकीर्दीत त्याला अनेक पुरस्कारही मिळाले. ते पुरस्कार ठेवण्यासाठी त्याने नवीन घर घेतलं आहे का? याचं उत्तर त्याने नुकतंच दिलं.

प्रसाद ओकची प्रमुख भूमिका असलेला ‘धर्मवीर’ हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. या चित्रपटातील त्याच्या कामाचं खूप कौतुक झालं. तर आता या चित्रपटासाठी नुकताच त्याला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

Vivian Dsena on Ladla Tag
विवियन डिसेनाला ‘लाडला’ टॅग कसा मिळाला? अभिनेत्याने स्वत: केला खुलासा; म्हणाला, “कलर्स टीव्हीसाठी…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
akshay kumar twinkle khanna
अक्षय कुमार व ट्विंकल खन्नाकडून मुंबईतील घराची विक्री; ४.८० कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरलेल्या या घराची किंमत किती? घ्या जाणून…
Santosh Juvekar
काही चित्रपट पैशांसाठी करावे लागतात; प्रसिद्ध अभिनेता म्हणाला, “मी कलाकार असलो तरी….”
Sudesh Lehri
घर विकलं, चपला बनवल्या, भाजीपाला विकला अन्…; प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला कठीण काळ
star pravah parivaar puraskar ceremony 2025
तारीख ठरली! ‘स्टार प्रवाह’ने केली पुरस्कार सोहळ्याची घोषणा, यंदा कोणती मालिका मारणार बाजी? नेटकरी म्हणाले…
hema malini laughed at ramdev baba
Video: गंगेत डुबकी मारणाऱ्या रामदेव बाबांनी केलं असं काही की…; हेमा मालिनींना हसू आवरेना
kiran mane shares post for maharashtrachi hasya jatra fame rohit mane
आमचा चित्रपट येतोय…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील ‘या’ अभिनेत्यासाठी किरण मानेंची पोस्ट, सांगितला खास अनुभव

आणखी वाचा : प्रसाद ओक व सई ताम्हणकरला हात जोडून मागावी लागली माफी, नेमकं प्रकरण काय?

हा पुरस्कार घेतानाचा एक व्हिडीओ प्रसादने नुकताच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला. या व्हिडीओत तो फिल्मफेअर पुरस्कार स्वीकारताना दिसत आहे. हा पुरस्कार घेतल्यावर निवेदकाने त्याला विचारलं, “प्रसाद ओकला या चित्रपटासाठी जे काही पुरस्कार मिळाले आहेत ते ठेवण्यासाठी त्याने नवीन घर घेतलं आहे असं आमच्या कानावर आलं आहे. हे खरं आहे का?” त्यावर उत्तर देत प्रसाद गमतीत म्हणाला, “तथास्तु. तुझी इच्छा लवकरच पूर्ण होवो.”

हेही वाचा : “आधी माझ्याकडे खूप पैसे होते, पण…”; प्रसाद ओकचा व्हिडीओ चर्चेत

हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त करत प्रसादने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, “अजून एक BLACK LADY घरात…!!! तीही अशा LADY च्या हातून जिचा मी लहानपणापासून चाहता आहे. THE GORGEOUS अश्विनी भावे. पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार टीम धर्मवीर, मंगेश देसाई आणि अर्थातच प्रवीण तरडे…!!!” आता त्याची ही पोस्ट खूप चर्चेत आली असून यावर त्याचे चाहते, त्याचबरोबर मनोरंजनसृष्टीतील त्याची मित्रमंडळी कमेंट करत त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

Story img Loader