नाटक, मालिका, चित्रपट अशा सगळ्या माध्यमांमध्ये आपला वेगळा ठसा उमटवणारा लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओक याचा आज ४९ वा वाढदिवस आहे. अभिनेत्याचा जन्म १७ फेब्रुवारी १९७५ रोजी झाला. प्रसादवर आज वाढदिवसानिमित्त मराठी कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अभिनेत्याची पत्नी मंजिरी ओक हिने देखील लाडक्या नवऱ्याला मजेशीर पोस्ट व फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मंजिरी ओकने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या तोंडावर मास्क असल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर तिने नवऱ्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. प्रसाद-मंजिरी यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. त्यामुळे तिने शेअर केलेल्या पोस्टवर आता नेटकऱ्यांसह अनेक कलाकारांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
हेही वाचा : संदीप पाठकसह ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्री झळकणार कलर्स मराठीच्या नव्या मालिकेत! प्रोमो पाहिलात का?
“प्रसाद फोटोत तोंड बंद आहे म्हणून तुला वाटत असेल की, मी अशी वागेन, गप्प बसेन, तुला बोलू देईन आणि मी फक्त ऐकेन. तर, जागा हो…फोटो आहे तो, मी फक्त फोटोमध्येच गप्प बसू शकते…तुला पर्याय नाही. Oh सॉरी सॉरी… आज चांगलं बोलायचं असतं ना? ओके आय लव्ह यू प्रसाद! स्वामी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…#बायकोप्रेम” अशी मजेशीर पोस्ट शेअर करत मंजिरीने नवऱ्याला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा : स्टार प्रवाहवर सुरू होणार नवीन मालिका, ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत झळकणार ‘हे’ कलाकार, प्रोमो आला समोर
दरम्यान, प्रसाद-मंजिरी यांची ओळख एका अभिनयाच्या कार्यशाळेत झाली होती. याठिकाणी दोघांची मैत्री होऊन पुढे, या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. ७ जानेवारी १९९८ मध्ये या जोडप्याने लग्नगाठ बांधली. नुकताच त्यांनी लग्नाचा २६ वा वाढदिवस साजरा केला. याशिवाय प्रसादच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर लवकरच तो ‘धर्मवीर २’ चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय प्रसादने दिग्दर्शित केलेले आणखी दोन सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.