‘गुलाबी साडी’ या संजू राठोडच्या गाण्याने सध्या जगभरात धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. सामान्य माणसांपासून ते अगदी बॉलीवूड सेलब्रिटींपर्यंत प्रत्येकाला या गाण्याची भुरळ पडली आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात सगळ्या मराठी कलाकारांनी एकत्र मिळून संजू राठोडच्या या ट्रेडिंग गाण्यावर डान्स केल्याचं पाहायला मिळालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धकधक गर्ल माधुरी दीक्षित, बॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसुझा ते आफ्रिकेच्या किली पॉलपर्यंत प्रत्येकाने या गाण्यावर ठेका धरला आहे. आता यांच्यापाठोपाठ मराठी कलाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्याने ‘गुलाबी साडी’ गाण्याचा ट्रेन्ड फॉलो केला आहे. प्रसाद ओकने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला एक गोड व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. त्याने काहीशा हटके पद्धतीने या ट्रेडिंग गाण्यावर व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा : Video : अखेर भारतात परतली मुक्ता बर्वे! विमानतळावर ‘नाच गं घुमा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स, मैत्रिणींना भेटून झाली भावुक

पाळीव श्वानाची केली खास तयारी

प्रसाद आणि मंजिरी ओक यांनी घरातील पाळीव श्वानाला गुलाबी रंगाचा ड्रेस, त्याच रंगाची टिकली, डोक्यावर गुलाबी रंगाचं फूल, गळ्यात मोत्याची माळ घालून सुंदर असं नटवलं होतं. याचा खास व्हिडीओ या जोडप्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला अभिनेत्याने सर्वत्र गाजणारं “गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी…राजा फोटो माझा काढं” हे गाणं जोडलं आहे.

हेही वाचा : ‘स्टार प्रवाह’वर सुरू होणार नवीन मालिका! तब्बल ९ वर्षांनी शिवानी सुर्वेचं पुनरागमन, तारीख अन् वेळ केली जाहीर

प्रसादच्या घरातील पाळीव श्वान मस्काराच्या वाढदिवसानिमित्त त्याची बायको मंजिरीने तिची खास तयारी केली होती. या व्हिडीओवर मराठी कलाकारांच्या कमेंट्सचा पाऊस पडला आहे. अमृता खानविलकर, स्वप्नील जोशी, दिप्ती केतकर, मधुगंधा कुलकर्णी या कलाकारांनी मस्काराला वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच या व्हिडीओला सुद्धा पसंती दर्शवली आहे.

हेही वाचा : Video : ‘मेरा पिया घर आया…’, नवऱ्याला सेटवर आलेलं पाहून माधुरी दीक्षित भारावली! रोमँटिक गाण्यावर केला जबरदस्त डान्स

दरम्यान, नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये अभिनेता प्रसाद ओकने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आता येत्या काळाच प्रसाद ‘धर्मवीर २’ चित्रपटात पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय त्याने काही दिवसांपूर्वीच ‘पठ्ठे बापूराव’, ‘वडापाव’ यांसारख्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prasad oak celebrate pet dog birthday shared video on gulabi sadi trending song sva 00